क्राईममराठवाडा

*बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी;महामार्गावरील जबरी चोऱ्या करणारी टोळी जेरबंद*

शेअर करा

 

 

बीड दि ६ ऑक्टोबर,प्रतिनिधी

 

एकटे गाठून नागरिकांना लुटणाऱ्या टोळीला बीडच्या स्थनिक गुन्हे शाखेने

Advertisement
अटक केली असून त्यांच्या कडून ३४ मोबाईलसह रोख रक्कम हस्तगत केली आहे.या टोळीने शहराच्या बाह्य भागासह हमरस्त्यावर लुट केल्याचे तपासात उघड झाले आहे.

 

दिलीप मधुकर उबाळे वय 42 वर्षे रा.वसंतराव नाईक कॉलेज समोर, नांदेड यांनी काही दिवसापूर्वी  पोलीस स्टेशन, अंमळनेर येथे  लुट केल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार   गु.र.नं.230/2020 कलम 392,34 भा.दं.वि.प्रमाणे दाखल झाला होता. काही दिवसांपासून बीड शहराचे बाहय भागात वॉकींगसाठी जाणारे एकांतातील लोकांना धाक दाखवून त्यांचे जवळील नगदी रुपये, मोबाईल व सोन्याचे दागिने अशा लुटमारीच्या घटना घडल्या होत्या, सदरचे गुन्हे (03) अज्ञात आरोपींनी केले असल्याचे माहिती फिर्यादींकडून मिळाली होती.

 

हेही वाचा: नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचे आवाहन

 

सदरची बाब गंभीरतेने घेवून मा.पोलीस अधीक्षक साहेब, बीड यांनी वरील घटनेतील आरोपींना तात्काळ जेरबंद करणे बाबतचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.एकीलवाले व त्यांची टिम आरोपीचे शोधकामी बीड शहर व परिसरात पेट्रोलींग करीत असतांना त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सराईत गुन्हेगार श्रावण गणपत पवार आणि  त्याचे दोन साथीदार रामा अमृतराव साळुके व सय्यद जावेद सय्यद जाफर सर्व रा.नवगण राजुरी ता.जि.बीड यांना त्यांचेकडील होंडा शाईन मो.सा.क्र. MH-12-HG-2403 व चोरीचे (34) मोबाईलसह ताब्यात घेतले. त्यांना अधिक विश्वासात घेवून विचारपुस करता त्यांनी सांगीतले की, आम्ही सर्वांनी 5 6 दिवसांपुर्वी डोंगरकिन्ही ते चुंबळी जाणारे रोडवरील घाटात वाहने आडवून वाहनातील लोकांकडून चोरी केल्याचे सांगीतले,

 

तसेच बीड शहराचे बाहय भागातील इतर ठिकाणी चोरी केल्याचे सांगीतले, त्यांचेकडून चोरीचे एकूण ( 34 ) मोबाईल हॅन्डसेट व गुन्हयात वापरलेली मो.सा.क्र. MH-12-HG-2403 असा एकूण 3,88,000 /- रु.चा मुद्येमाल ताब्यात घेतला. चौकशीअंती वरील आरोपींचा पोलीस स्टेशन, अंमळनेर गुरनं 230/2020 कलम 392,34 भादंवि व पो.स्टे.बीड ग्रामीण गुरनं 320/2020 कलम 392,34 भादंवि या गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने जप्त मुद्येमालासह आरोपींना पुढील तपासकामी पोलीस स्टेशन, अंमळनेर येथे हजर केले आहे.

गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि.डोंगरे, पो.स्टे.अंमळनेर हे करीत आहेत. सदर आरोपीकडून अशा प्रकारचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. वरील गुन्हयातील चोरलेल्या मुद्येमाला बाबत व त्यांनी केलेल्या आणखीन गुन्हयाबाबत तपास चालू आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, बीडचे पो.नि.श्री.भारत राऊत, पो.नि..रविंद्र गायकवाड, सायबर सेल, स्था.गु.शा.चे स.पो.नि.आनंद कांगुणे, पो.उप.नि.गोविंद एकीलवाले, पोलीस कर्मचारी तुळशीराम जगताप, शेख सलीम बालाजी दराडे, रविंद्र गोले, श्रीमंत उबाळे, मनोज वाघ, विकास वाघमारे, राहूल शिंदे, प्रसाद कदम, कैलास ठोंबरे, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, युनूस बागवान, सखाराम पवार, नरेंद्र बांगर, विकी सुरवसे चालक अतुल हराळे, संतोष हारके यांनी केली.

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: