आरोग्यताज्या घडामोडी

Hingoli- *महाराष्ट्र राज्य* *दलीतमित्र* *संघ व* *आर्यवैश्य महासभा कोरोना विरोधात सक्रिय-डॉ विजय* *निलावार*

शेअर करा

 

हिंगोली,दि 23 मार्च ,टीम सीएमन्यूज

सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या समाज सेवकाना शासन डॉ बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र /समाजभूषण पुरस्कारांनी सन्मानित करते अश्या पुरस्कारार्थी च्या महाराष्ट्र राज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र संघ तसेच महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेने कोरोना महामारी विरोधात लढा देण्याचा संकल्प करून स्वयंस्फूर्तीने कार्यान्वय केले आहे.
जागतिक आरोग्य संघटना, केंद्र आणि राज्यशासन ,तसेच स्थानिक प्रशासन ह्यांच्या निर्देशाचे पालन स्वतः करून इतरांनाही पालन करण्यासाठी ह्या दोन्ही राज्यस्तरीय संघटनेने कंबर कसल्याचे दलितमित्र संघाचे राज्य कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख पत्रकार डॉ विजय निलावार यांनी सांगितले.
संघाचे पदाधिकारी आणि सदस्य तसेच संघाच्या संबंधित सर्व प्रेमी मंडळी यांनी भविष्यातही कोरोना संसर्ग बाधा, आणि प्रादुर्भाव ला उध्वस्त करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर स्वयंस्फूर्तीने सुरू करून जगा आणि जगू द्या, संयम पाळा गर्दी टाळा,सामाजिक संपर्क टाळा व गर्दी टाळा,कोरोना संसर्गाची शृंखला तोडा आणि आरोग्य जोडा,विषाणूचा वाहक न होता जीवन वाहक व्हा,हस्तांदोलन टाळा संयम पाळा, घाबरू नका प्रतिबंध करा अन संयम राखत निर्णायक कृती करा ,आदी संदेश आणि जागृती च कार्य केले आहे.प्रत्येक जण जणू बाधित असल्याचं समजून त्याचा पासून सहा फूट अंतर ठेवा ,आणि हात स्वछ धुवून निर्जंतुकीकरनं नंतरच वापर करा असे निर्देश ही मंडळी तळागाळातील जनतेपर्यंत पोचवत असल्याने अनेकांनी कौतुक केलं आहे.विशेष म्हणजे हे सर्व करताना प्रत्यक्षात मात्र लोक संपर्कात जवळ न जाता अन्य पर्यायांची निवड करून मानवतावादी दृष्टीकोनातून कुठल्याही प्रसिद्धीची हाव न करता सेवा सुरू असल्याचंही डॉ विजय निलावार यांनीं सांगितलं.जागतिक आरोग्य संघटना ,केंद्र आणि राज्य शासन, स्थानिक प्रशासन ह्यांच्याच दिशा निर्देशास सर्वोच्च प्राधान्य देण्याचा संकल्प दोन्ही संघटनेच्या सर्व संबंधितांनी केला असून काय करावं आणि काय करू नये ह्याची माहिती क्षणोक्षणी देणाऱ्या सर्व सम्बधितांच पत्रकार , समाजसेवक, डॉकटर्स, पोलीस, प्रशासन,आदी व त्यांचा स्टाफ , ह्या महामारी विरोधात आपला जीव धोक्यात घालून इतरांचे जीव वाचवणाच्या प्रक्रियेत सहभागी अश्या सर्व राष्ट्र रक्षकांच्या कार्यास अभिवादन करून जगा आणि जगू द्या, हम सुधरेंगे युग सुधरेगा, हे लक्षात घेऊन कोरोनाला गावापासून ते जागतिक पातळी पर्यंत उध्वस्त करू या , असा आमच्या संघाचं निर्धार आहे हे डॉ निलावार ह्यनी स्पष्ट केलं.काय करावं आणि काय करू नये ह्याची अधिकृत माहिती, शासकीय दिशा निर्देश क्षणो क्षणी मिळत असल्या ने ह्यावरूनच कृती करावी ,अफवा अंधश्रद्धा ,आणि कही सुनी वर विश्वास न ठेवता आत्मविशास वाढवावा असे आवाहनही यांनी केलं आहे.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: