Saturday, September 6, 2025
Homeप्रादेशिक बातमीपोलिस कर्मचाऱ्याने केली फायरिंग पत्नीचा मृत्यू

पोलिस कर्मचाऱ्याने केली फायरिंग पत्नीचा मृत्यू

hingoli police crime news हिंगोली पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने फायरिंग केल्याने पत्नीचा मृत्यू झाला. तर मुलगी, सासू व मेव्हाण गंभीर जखमी झाला.

ही घटना २५ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलिस अधिकारी दाखल झाले आहेत. वसमत शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी विलास बळीराम मुकाडे यांचे हिंगोली शहरातील प्रगतीनगरात घर आहे.

बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ते घरी आले असता त्यांनी पत्नीवर गोळी झाडली. त्यानंतर मुलगी, सासू व मेव्हण्यावरही गोळीबार केला. यात पत्नीचा मृत्यू झाला असून मुलगी, सासू व मेव्हणा जखमी झाले. जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचारकरून नांदेडला रेफर करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस निरीक्षक श्यामराव डोंगरे आदींचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर विलास मुकाडे हा पळून गेला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. घटनेचे कारण समजू शकले नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments