ताज्या घडामोडीमराठवाडा

*बीड मध्ये कोरोना पॉझिटिव्हचा उपचारादरम्यान मृत्यू;एकाची आत्महत्या*

दोघेही गेवराई तालुक्यातील

शेअर करा

बीड दि ११ जुलै टीम सीएम न्यूज

 

बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. हा रुग्ण जिल्ह्यातील उमापूर येथील होता.दुसऱ्या घटनेत गेवराई येथील क्वारटीन असताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी घडली.

हेही वाचा :*बीड जिल्ह्यात धक्कादायक,9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर

बीड जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गेवराई तालुक्यातील उमापूर येथील  पॉझिटिव्ह रुग्णाचा स्वब ९ जुलै रोजी पॉझिटिव्ह आला होता त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते आज सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. याच तालुक्यातील वाकदरातांडा येथील ३५ वर्षीय तरुणाला कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्याला गेवराई येथील नगर पंचायत सभागृहात क्वारटीन करण्यात आले होते. त्याचा आरोग्य प्रशासनाने त्याचा स्वब टेस्टिंग साठी घेतला होता मात्र त्याचा अहवाल येणे बाकी आहे. त्यापूर्वीच त्यांनी भीतीने आत्महत्या केली असावी असा कयास व्यक्त केला जात आहे.

आज बीड जिल्ह्यातील ७१७ व्यक्तींचे स्वब टेस्टिंग साठी अंबेजोगाई येथील कोविड प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यापैकी २८६ अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी ९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या ४३१ अहवाल प्रलंबित आहेत. तर २६९ स्वब निगेटिव्ह आले असून ८ अनिर्णीत आहेत.

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close