ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*अहमदनगर जिल्ह्याला दिलासा १९३निगेटिव्ह;फक्त०६ पॉझिटिव्ह*

66 रुग्णांची कोरोनावर मात

शेअर करा

 

अहमदनगर दि 12 जुलै टीमसीएम न्यूज

दररोज वाढणारे कोरोना पॉझिटिव्ह चे आकडे कमी झाले असून आज जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आन ०६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.तर १९३ निगेटिव्ह आले आहेत.त्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.

नगर शहरातील सर्जेपूरा भागातील ०३, पाइपलाईन रोड ०१, नगर ग्रामीण मध्ये विळद ०१ आणि पाथर्डी येथील एक रुग्ण आढळून आला. यामुळे जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ३०७ इतकी झाली आहे. तर एकूण रुग्णांची संख्या ९६३ इतकी झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी ६६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ६३४ इतकी झाली आहे.
*उपचार सुरू असलेले रुग्ण: ३०७*
*बरे झालेले रुग्ण: ६३४*
*मृत्यू: २२*
*एकूण रुग्ण संख्या: ९६३*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close