क्राईममराठवाडा

*जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू*

दवाखान्यात दाखल केल्यावर मृत्यू घोषित

शेअर करा

बीड दि 13 जुलै टीमसीएम न्यूज

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील फत्तेवडगाव येथे पहाटे चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या व्यक्तीला  काही लोकांनी एकत्र येऊन बेदम मारहाण केली.त्यामध्ये दवाखान्यात नेल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची घटना पहाटे घडली.घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

बीड जिल्ह्यात 9 कोरोना पॉझिटिव्ह;आष्टीत आणखी एक

पहाटे फत्तेवडगाव गावात चोरीच्या उद्देशाने तीन चार जण आले होते त्यापैकी एक जण जमावाच्या हाती लागल्याने काही लोकांनी त्याला बेदम मारहाण केली .त्याला उपचारासाठी कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
अलीम उर्फ विशाल नारायण भोसले असे मृत व्यक्तीचे नाव असून तो पुंडी वाहिरा येथील रहिवासी आहे.

या घटनेची मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माधव सुर्यवंशी कर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल झाले.या घटनेची माहिती घेण्यासाठी बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे हेही घटनास्थळी पाहणी करण्यासाठी दाखल झाले आहेत .

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close