कृषीवार्ताताज्या घडामोडी

*कृषी विभागाने खतांसाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात ;माजी मंत्री राधाकृष्ण विखे*

माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांचे कृषी मंत्र्यांना पत्र

शेअर करा

 

शिर्डी,दि. १४ जुलै टीम सीएम न्यूज

खतांच्‍या टंचाईमुळे शेतक-यांसमोर गंभीर समस्‍या निर्माण झाली आहे. कृषि विभागाच्‍या नियोजना अभावी ऐन खरीप हंगामात पेरणीलाच खोडा झाल्‍याने शेतकरी हवालदील झाले आहेत. उपलब्‍ध नसलेली खतं आणि बियाणांमध्‍ये झालेली फसवणूक यामुळे खरीप हंगाम वाया जाण्‍याची शेतक-यांमध्‍ये निर्माण झालेली भिती लक्षात घेवून कृषि विभागाने खतांसाठी तातडीने उपाययोजना कराव्‍यात अशी मागणी माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी कृषिमंत्र्यांकडे केली आहे.

कृषि मंत्री दादा भुसे यांना खतं टचांई आणि बियाणांच्‍या निर्माण झालेल्‍या प्रश्‍नांसंदर्भात आ.विखे पाटील यांनी सविस्‍तर पत्र पाठवुन शेतक-यांपुढे निर्माण झालेल्‍या प्रश्‍नांची वस्‍तुस्थिती निदर्शनास आणून दिली आहे. यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्‍याने राज्‍यातील शेतक-यांनी खरीप हंगामाच्‍या पेरणीची तयार उत्‍साहाने सुरु केली होती. तथापी आवश्‍यक खते उपलब्‍ध न झाल्‍याने शेतक-यांचे कष्‍ट वाया जाण्‍याची भिती व्‍यक्‍त करतानाच कोणत्‍याही जिल्‍ह्यात मागणीप्रमाणे खतांचा पुरवठा होवू शकलेला नाही. युरीया खताची उपलब्‍धता कमी झाल्‍याने लिकींग तक्रारीही मोठ्या प्रमाणात झाल्‍या आहेत. अनावश्‍यक खतं आणि रसायनांची सक्‍तीने खरेदी करायला लावून शेतक-यांना आर्थिक भुर्दंड दिला जात असल्‍याकडे आ.विखे पाटील यांनी कृषिमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

राज्‍यात सोयाबीन पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्‍याने सोयाबीन बियणांची मागणीप्रमाणे उपलब्‍धता झाली नाही. अनेक कपंन्‍याकडुन निकृष्‍ठ प्रतीचे बियाणे शेतक-यांच्‍या पदरात पडल्‍याने त्‍याची उगवण झाली नसल्‍याच्‍या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्‍त झाल्‍या आहेत. सरकारकडुन आणि कंपन्‍याकडुन शेतक-यांना कोणताही न्‍याय मिळाला नाही. त्‍यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतक-यांपुढे उभे राहीले आहे. सरकारकडुन कोणतीही मदत मिळत नसल्‍याने शेतक-यांना अखेर न्‍यायालयात दाद मागवी लागत आहे. कृषि विभागाच्‍या दुर्लक्षामुळे शेतक-यांच्‍या हातून हा खरीप हंगाम वाया जात असल्‍याची बाब आ.विखे पाटील यांनी पत्रात नमुद केली आहे.

कोरोना संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्‍या शेतक-यांना चालू खरीप हंगाम हाच एक दिलासा देणारा आहेू. त्‍यामुळेच मोठ्या अपेक्षा ठेवून शेतक-यांनी खरीप हंगामाची तयारी केली. परंतू कृषि विभागाचा हलगर्जीपणा व नियोजनशुन्‍यतेचा मोठा फटका शेतक-यांना सहन करावा लागला. ही वस्‍तुस्थिती लक्षात घेवून, खतांसाठी शेतक-यांच्‍या दुकानांपुढे लागत असलेल्‍या रांगा, शेतक-यांना पावत्‍या न देता खते आणि बियाणे विक्री, खतांचे लिकींग, करणा-या कृषिसेवा केंद्रांची चौकशी करुन कारवाई करण्‍याची मागणी आ.विखे पाटील यांनी कृषिमंत्र्यांकडे केली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close