ताज्या घडामोडीप.महाराष्ट्र

*अहमदनगर जिल्ह्यात वाढती कोरोना संख्या;दिवसभरात ११७ बाधितांची नोंद*

२२ जणांनी कोरोनावर मात केली.

शेअर करा

 

 

 

 

अहमदनगर, दि. १७ जुलै टीम सीएम न्यूज

 

अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना तपासणीचा वेग वाढल्याने कोरोना बाधित येण्याचे प्रमाण वाढत आहे.दिवसभरात ११७ कोरोना बाधित रुग्णांची नोंद अहमदनगर जिल्ह्याच्या खात्यात झाली आहे.

दिवसेंदिवस वाढती कोरोना बाधितांची संख्या मुळे प्रशासनाचा भार वाढत आहे.दररोज प्रतिबंधित क्षेत्राची वाढ होत आहे. जिल्ह्यात सध्या ६१६ बाधितांवर उपचार सुरु आहेत.जिल्ह्यातील एकूण मृत्यू ३३ झाले असून ७९४ बाधित बरे होऊन गेले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्यात १४३९ इतकी झाली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दिवसभरात ६८ व्यक्तींचे अहवाल बाधित आले त्यामध्ये सकाळी २१ व्यक्तींचे त्यानंतर २९ व्यक्तींचे  आणि सायंकाळी १८ व्यक्तींचे अहवाल बाधित आढळून आले.रात्री उशिरा १८ जणांचे अहवाल पॉझिटीव आढळून आले होते. खासगी टेस्ट लॅबमध्ये ३१ व्यक्ती बाधित आढळून  आले आहेत.

आज सकाळी २२ जणांनी कोरोनावर मात केली. त्यांना आज डिस्जार्च देण्यात आला.

सकाळी आलेल्या अहवालानुसार, पारनेर तालुक्यातील ०३ (साबळेवाडी ०१, नांदूरपठार ०१ आणि पळसपूर ०१). भिंगार येथील १०, नगर ग्रामीण मधील ०३ (वाकोडी ०१, डोंगरगण ०१), श्रीगोंदा तालुक्यातील ०५ (कोळगाव ०३, लोणी व्यंकनाथ ०२) रुग्णांचे अहवाल पॉझिटीव आढळून आले.

दरम्यान, काल रात्री १८ जणांचे अहवाल पॉझिटीव आढळून आले. यामध्ये संगमनेर १२ (कुरण ०२, राजापूर ०१, बागवानपुरा ०४, घुलेवाडी ०१, सय्यदबाबा चौक ३, सुकेवाडी ०१), नगर शहर ०५, आणि अकोले ०१ (कळंब) असे बाधित रुग्ण आढळून आले.

सायंकाळी जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये भिंगार १३, संगमनेर तालुका ०६ (मालदाड रोड ०१, रहेमत नगर ०१, गणेश नगर ०१, निमोन ०१, निंबाळे०१), नेवासा ०५ (पुनतगाव ०२, सोनई ०३), नगर शहर ०३, श्रीरामपूर ०२ अशा रुग्णाचा समावेश आहे.

सायंकाळी उशिरा आलेल्या अहवालात भिंगार ०२, नगर शहर ०५, श्रीरामपूर ०३, श्रीगोंदा ०३ (घोगरगाव ०२ सांगवी दुमाल ०१),, कर्जत ०१ ( नांदगाव), राहुरी ०१ (गुहा), अकोले ०३ अशा रुग्णाचा समावेश आहे.

 

बीड जिल्ह्यात कोरोना बाधित 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close