ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात १३२ कोरोना बाधितांची भर*

*उपचार सुरू असलेले रुग्ण:६१३

शेअर करा

 

 

 

अहमदनगर दि. १८ जुलै टीम सीएम न्यूज

 

अहमदनगर जिल्ह्यातील वाढता कोरोना चिंतेचा विषय बनत चालला आहे. दिवसभरात १३२ कोरोना बाधित रुग्णांची भर पडली असून जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६१३ इतकी झाली आहे.तर एकूण जिल्ह्याचा कोरोना आकडा १५७१ इतका झाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात सकाळी आलेल्या कोरोना रिपोर्ट मध्ये ५४ कोरोना बाधित आढळून आले होते.त्यानंतर उशिरा रात्री आलेल्या  खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात तब्बल ७८ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली.त्यामुळे दिवसभरातील बाधित व्यक्तींची संख्या १३२ झाली.

दिवसभरात १८७ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. तर आतापर्यंत ९२० रुग्ण बरे झाले आहेत.

उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६१३ इतकी झाली आहे.

बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये  नगर शहर १० (मार्केट यार्ड ०३, नालेगाव ०१, केडगाव ०१, भिस्तबाग चौक ०१, सूडके मळा ०१, रेल्वे स्टेशन ०१, रंगार गल्ली ०१, बागड पट्टी ०१).

श्रीरामपूर ०४ (शहर ०२, बेलापूर ०१, शिरसगाव ०१,).

कर्जत ०२ (शहर ०१, माही जळगाव ०१). अकोले ०४ (शहर ०३, लहीत ०१)

जामखेड ०२ (सोनेगाव ०१, साकत०१).

नगर ग्रामीण ०३ (निंबलक ०१, घोस्पुरी ०१, निमगाव घाना ०१).

पाथर्डी ०१, शेवगाव १० (शहर ०५, मुंगी ०५).

नेवासा ०३ (सोनई).

पारनेर ०९ (लोणी मावळा ०३, पिंपळगाव रोठा ०२, कर्जुले हर्या ०१, कुंभार वाडी ०१, वडनेर बुद्रुक ०१, खडक वाडी ०१)

संगमनेर ०६ (गुंजाळ वाडी ०३, कुरण ०३) अशा रुग्णाचा समावेश आहे.

 

 

 

*उपचार सुरू असलेले रुग्ण:६१३

*बरे झालेले रुग्ण: ९२०

*मृत्यू: ३८

*एकूण रुग्ण संख्या:१५७१

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close