ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*आमदार मोनिका राजळेंचा अहवाल निगेटिव्ह;१४ दिवस राहणार होम क्वारंटीन*

मतदार संघातील सर्व नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

शेअर करा

 

पाथर्डी दि १९ जुलै टीम सीएम न्यूज

पाथर्डी शेवगावच्या आमदार मोनिका राजळे या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने  होम क्वारंटीन झाल्या आहेत.दरम्यान,त्याची कोरोना चाचणी करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे.

पाथर्डी शेवगावच्या आमदार मोनिका राजळे या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांची जिल्हा शासकीय रुग्णालय अहमदनगर येथे घशाचा स्रावाचा नमुना घेऊन कोरोना टेस्ट घेण्यात आली. तेव्हापासून त्या होम क्वारंटीन झाल्या आहेत. त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. परंतु त्यांना १४ दिवस होम क्वारंटीन राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मोनिका राजळे स्वतःच्या घरीच क्वारंटीन झाल्या आहेत. त्यांनी मतदार संघातील सर्व नागरिकांना घाबरून न जाता, स्वतःची  काळजी घ्यावी  असे आवाहन  केले आहे. होम क्वारंटीन असल्या तरी त्या दूरध्वनीद्वारे सतत जिल्हाधिकारी अहमदनगर, शेवगाव, पाथर्डी तहसीलदार दोन्ही तालुक्यातील आरोग्य अधिकारी, पोलीस प्रशासन यांच्या संपर्कात असून, त्यांनी प्रशासनास पाथर्डी – शेवगावसाठी तातडीच्या उपाययोजना बरोबरच, रॅपिड   स्क्रीनिंग, टेस्टिंग आणि उपचार वाढवण्या बाबतच्या सूचना दिल्या आहेत. आणि त्या  बाबतचा आढावाही त्या घेत आहेत.गरज वाटल्यासच आमदार यांच्या फोनवर संपर्क साधावा, असे आवाहन राजळे यांनी केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close