ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*लग्न समारंभातून कोरोनाचा अधिक फैलाव;राज्यमंत्री तनपुरे*

शेअर करा

 

पाथर्डी दि 20 जुलै टीमसीएम न्युज

राज्यात लॉकडाऊन शिथिलतेनंतर अनलॉकची घोषणा झाली.त्यांनतर मोजक्या लोकांकरिता अटी शर्तीसह लग्न समारंभाला परवानगी देण्यात आली.मात्र तसे न होता लग्नात गर्दी बघायला मिळत आहे.अशा गर्दीतूनच कोरोनाचा फैलाव झालाचे मत मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले.

तनपुरे यांच्या उपस्थितीत पाथर्डी तालुक्यात वाढत्या  कोरोनांची रुग्ण संख्या पाहता अधिकारी व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी प्रांतधिकारी देवदत्त केकाण, तहसिलदार नामदेव पाटील,उपविभागीय पोलीस प्रांतधिकारी मंदार जावळेगटविकास अधिकारी सुधाकर मुंडे,तालुका आरोग्यधिकारी डॉ भगवान दराडे, मुख्यधिकारी धनंजय कोळेकर,वैद्यकीय अधिकारी डॉ नवनाथ आव्हाड प्रशासकीय अधिकारी उपस्थितीत होते.

यावेळी अमोल वाघ,नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड,नगरसेवक महेश बोरुडे यांनी बैठकी दरम्यान काही सूचना मांडल्या.महसूल, आरोग्य,पोलीस विभागाला वाढत्या कोरोना रुग्णाच्या उपाययोजने बाबत योग्यत्या सूचना यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केल्या.

Advertisement
Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close