ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*चार चाकी-दुचाकीच्या अपघातात पती पत्नी ठार*

शेअर करा

 

पाथर्डी दि 21 जुलै टीम सीएम न्यूज
कोरडगाव-पागोरी पिंपळगाव रस्त्यावर पिंपळगाव कडे जाणारी दुचाकी आणि क्रेटा गाडीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत पतिपत्नी ठार झाल्याची घटना दुपारी घडली.

कोरडगाव पागोरी पिंपळगाव रस्त्यावर भरधाव वेगाने येणा-या हुंडाई क्रियेटा या चार चाकीच्या धडकेत दुचाकीवरस्वार असलेले संजय भिमा गाडे,पत्नी योगीता संजय गाडे रा.कळसपिंप्री यांचा मृत्यू झाला आहे.

पती-पत्नी या दोघांना जबर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.
हा अपघात कोरडगाव पासुन सुमारे 1 किमी अंतरावर झाला.पिंपळगावकडून येणा-या क्रियेटा गाडी एम एच-20 ई ई 6787 या गाडीने पिंपळगावकडे जाणारी दुचाकी क्र एम.एच17 बी क्यु 7453 हीला जोराची सामोरा समोर धडक दिली यात संजय गाडे वय 46 व त्यांची पत्नी योगीता संगीता गाडे वय 41 हे ठार झाले आहेत.

अपघात संजय गाडे यांचा हात व पाय निकामी झाला असुन पत्नी व त्यांना डोक्यास गंभीर स्वरुपाचा मार लागला सदर जखमींना प्रथम उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी येथे प्रथमोपचार करुन नंतर अहमदनगर येथे हलविण्यात आले होते त्याठिकाणी उपचारादरम्यान दोन्ही मयत झाले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close