Top-न्यूजब्रेकिंग न्यूज

*अहमदनगर जिल्ह्यात आज ५८ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज;बाधितांच्या संख्येत ७० ने वाढ*

शेअर करा

 

अहमदनगर दि 22 जुलै टीम सीएमन्यूज

जिल्ह्यात काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत रुग्ण संख्येत ७० ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता ९२५ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २२६२ इतकी झाली आहे. दरम्यान, आज ५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १२९१ इतकी झाली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना टेस्ट लॅबमध्ये आढळून आलेल्या ७० बाधित रुग्णामध्ये, संगमनेर तालुका २४, पारनेर तालुका ०१, श्रीगोंदा तालुका ०५, नगर शहर १३, नगर ग्रामीण २३, श्रीरामपूर ०३, राहुरी ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे .आतापर्यंत जिल्ह्यात ४६ कोरोना बधितांचा मृत्यू झाला आहे.

*उपचार सुरू असलेले रुग्ण:९२५*

*बरे झालेले रुग्ण: १२९१*

*मृत्यू: ४६*
*एकूण रुग्ण संख्या:२२६२*
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close