ताज्या घडामोडी

*अहमदनगर जिल्ह्यात २४ तासात वाढले १५१ कोरोना बाधित;जिल्ह्यात आज ९३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज*

कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९० जणांचे अहवाल बाधित

शेअर करा

 

 

अहमदनगर दि,२३ जुलै टीम सीएम न्यूज

अहमदनगर  जिल्ह्यात  गेल्या २४ तासात जिल्हा रुग्णालयाची कोरोना टेस्ट लॅब, अँटीजेन चाचण्या आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेले असे मिळून एकूण १५१ रुग्णांची नोंद झाली. कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९० जणांचे अहवाल बाधित आढळले. अँटीजेन चाचणीमध्ये ०८ जण बाधित आढळले तर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या अहवालात पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आणि आयसीएमआर पोर्टलवर नोंद झालेल्या ५३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामुळे उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता १३३७ इतकी झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १३८४ इतकी आहे. जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या आता २७७१ इतकी झाली आहे.

दरम्यान, जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅब मध्ये काल (बुधवारी) सायंकाळपासून आज सायंकाळ पर्यंत  रुग्ण संख्येत  ९० ने वाढ झाली. जिल्ह्यातील भिंगार येथे २६, राहुरी तालुक्यात ०७,अकोले ०६,नगर शहर ०८,नगर ग्रामीण ११,संगमनेर १२,शेवगाव ०५ अकोले ०६ यांचा समावेश आहे. याव्यतिरिक इतर तालुक्यात कमी जास्त रुग्ण आढळून येत आहे.

बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये.

नेवासा (३) – नेवासा फाटा (1), सोनई (2),

भिंगार (२६) – ब्राम्हणगल्ली  (3), नेहरुचौक (3) माळीगल्ली  (2) गवळीवाडा (4),कुंभारगल्ली (1), घासगल्ली (1),  मोमिनगल्ली (1) विद्याकॉलनी (1) शुक्रवार बाजार (2) कॅंटॉनमेंट चाळ (1), सरपनगल्ली (3), पंचशिल नगर (1), काळेवाडी (1), आंबेडकर कॉलनी (1), भिंगार (1)

राहुरी (०७)- वरवंडी (2), वांबोरी (1), राहुरी (1), राहुरी बु. (1), देवळाली (1), कात्रड (1),

कोपरगाव (1)- रवांदे (1),

अकोले (०६) – पेंडशेत (1),  धुमाळवाडी (1), बहिरवाडी (3), देवठाण (1),

पारनेर (०१) – कान्हुर पठार ,

नगर शहर (०८) – एचडीएफसी बँकेजवळ (2), केडगाव (२), बागडपट्टी (1), भवानीनगर (1), प्रेमदानचौक (1),  शहर  मध्य वस्ती (०१)

नगर ग्रामीण (११)- टाकळी खातगाव(1), बु-हाणनगर (2),विळद (६), निंबळक २,

शेवगाव (५)- थाटे ३, शेवगाव शहर ०२

कर्जत (०१)- राशीन,

श्रीगोंदा (०६)- काष्टी ०१, बन पिंपरी ०२, कोळगाव ०३

राहता (०१)- गोळगाव

श्रीरामपूर (०२) – मुळा प्रवरा टांगे गल्ली (१) नरसाळी (1),

संगमनेर (१२)-  दाढ खु. (1), जनतानगर(1), कासार दुमाला (9), पद्मानगर (1) येथील रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ०८ जण बाधित आढळले. त्यात, श्रीरामपूर ०७ आणि राहाता ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ५३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.  यामध्ये, श्रीरामपूर ०२, संगमनेर ०७, मनपा २०, राहाता ०८, नगर ग्रामीण १०, पारनेर ०२, पाथर्डी ०१, शेवगाव ०१, अकोले ०२.

*उपचार सुरू असलेले रुग्ण: १३३७*

*बरे झालेले रुग्ण: १३८४*

*मृत्यू: ५०*

*एकूण रुग्ण संख्या:२७७१*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close