ताज्या घडामोडी

*पाथर्डीत ९ कोरोना बाधितांची भर;पुन्हा लॉकडाऊन वाढले*

24 जुलै ते 26 जुलै रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत हे लॉकडाऊन

शेअर करा

 

 

पाथर्डी दि 23 जुलै टीमसीएम न्युज

पाथर्डी शहरात  पुन्हा लॉकडाऊन वाढण्याचा निर्णय पाथर्डीचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी घेतला असून दिनांक 26 जुलै रात्री 11.59 वाजेपर्यंत हे  लॉकडाऊन असणार आहे.

शहरात  झपाट्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्या कारणाने दि.१७ ते २३ जुलैपर्यंत तहसीलदार तथा इंसिडेंट कमांडर नामदेव पाटील यांनी अत्यावश्यक सेवा वगळून पाथर्डी बंदचे आदेश जारी केले होते. त्यानंतर पुन्हा रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे .दि 24 जुलै ते 26 जुलै रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत हे लॉकडाऊन असणार आहे.

पाथर्डी तालुक्यात नऊ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. गुरुवारी पाथर्डी शहरात सहा तर शिरसाटवाडी येथे तिन असे नऊजण कोरोना बाधीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरातील राष्ट्रवादीचा युवा नेता व त्याची पत्नी, जय भवानी चौकातील एक व्यापा-याचा मुलगा व शिरसाटवाडी येथील तिघेजण कोरोना बाधीत आढळले. त्यांची तपासणी श्रीतिलोक जैन विद्यासलयातील कोवीड केंद्रावर करण्यात आली. जय भवानी चौकातील व्यापारी, त्यांची पत्नी व सुन असे तिघेजण नगरला  खाजगी दवाखान्यात उपचार घेत असताना त्यांचा अहवाल पाँझीटीव्ह आला आहे.

*जिल्ह्यात २४ तासात वाढले १५१ रुग्ण;जिल्ह्यात आज ९३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज*

शहरातील श्री तिलोक जैन विद्यालय येथील कोव्हीड सेंटरवर अँटी रॅपिड किटने तात्काळ तालुक्यातील 19 लोकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 6 जण कोरोनाचा संसर्गात आल्याचे निष्पन्न झाले.तालुक्यातील कोरोना बाधीतांची संख्या आता 141 झाली आहे.तर 82 कोरोना बाधित वरती उपचार चालू आहे.

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close