*सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यात ‘लॉकडाऊन’ नाही पालकमंत्री मुश्रीफ यांची स्पष्टोक्ती*
*विनामास्क फिरणार्यावर कडक कार्यवाही करण्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांचे निर्देश*
अहमदनगर दि 24 जुलै टीमसीएम
सध्या जिल्ह्यात लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही असे राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करणे आणि सोशल डिस्टंन्सिंग पाळणे आवश्यक आहे. विनामास्क फिरणार्यावर कडक कारवाई करा, असे निर्देश राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषयक सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप
आमदार नीलेश लंके, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे आदी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये दरदिवशी ३०० चाचण्या केल्या जात आहेत. ही संख्या येत्या दोन दिवसांनंतर प्रतिदिन एक हजार अशी होणार असल्याने बाधितांच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या वेगाने करणे शक्य होईल आणि संसर्गाची साखळी तोडण्यात यश येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात सुरुवातीच्या दोन तीन महिन्यात कोरोना विषाणू संसर्ग आटोक्यात होता. त्यानंतर नागरिकांची बाहेरगावाहून ये-जा वाढल्याने संसर्गाचे प्रमाण वाढले. ते रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने चाचण्यांची संख्याही वाढविली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या वाढताना दिसत असली तरी आरोग्य यंत्रणा पूर्णपणे दक्ष आहे. सध्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये दरदिवशी ३०० चाचण्या केल्या जात आहेत. ही संख्या येत्या दोन दिवसांनंतर प्रतिदिन एक हजार अशी होणार असल्याने बाधितांच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या वेगाने करणे शक्य होईल आणि संसर्गाची साखळी तोडण्यात यश येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रुग्णांची संभाव्य वाढती संख्या लक्षात घेऊन रुग्णालयातील बेड्सची संख्या, ऑक्सीजन सिलींडरची उपलब्धता याचा आढावा घेतला असून पायाभूत सुविधा आणि औषधांचा पुरवठा कोठेही कमी पडणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्ह्यात रुग्णांकडून काही खाजगी रुग्णालये अवाजवी बील आकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारींची दखल घेतली असून अशा अवाजवी शुल्क आकारणार्या खाजगी रुग्णालयांचे ऑ़़डिट केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासक नियुक्ती मध्ये पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप नसावा;ग्रामविकास मंत्र्यांनी घेतली अण्णांची भेट*