ताज्या घडामोडीमराठवाडा

*महावितरणची वाघीण ठरली, “महाराष्ट्र गौरव” पुरस्काराची मानकरी*

शेअर करा

कडा दि 27 जुुलै टीमसीएम न्युज

एक स्त्री असूनही पुरुषाप्रमाणे लढून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणा-या आष्टीच्या वीज महावितरणची वाघीण म्हणून नावलौकिक असलेल्या वरिष्ठ तंत्रज्ञ उषा जगदाळे या महाराष्ट्र गौरव पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.

राज्यात फेब्रुवारी महिण्यापासून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनस्तरावरुन लाॅकडाऊनची स्थिती आहे. या आपत्कालिन परिस्थितीत कोरोनाच्या धास्तीने प्रत्येकजण घरातमध्ये असतानाच, नागरीकांना अखंड वीज पुरविण्याकरिता वीज महावितरण कंपनीचे कर्मचारीही मोठे परिश्रम घेत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये एक स्त्री असून एकही दिवस सुट्टी न घेता पुरुषांच्या बरोबरीने आपल्या कर्तृत्वाचा राज्यभर ठसा उमटवणा-या आष्टीच्या वीज महावितरणमध्ये कार्यरत असलेल्या वरिष्ठ तंत्रज्ञ उषा जगदाळे यांच्या साहसी कार्याची जळगाव खान्देश येथील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या सेवक सेवाभावी संस्थेने दखल घेतली आहे. महाराष्ट्र गौरव पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. वीज महावितरणची नावलौकिक वाघीण या पुरस्काराची मानकरी ठरल्यामुळे त्यांचं सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

*प्रेरणादायी पुरस्कार....*महाराष्ट्र गौरव हा पुरस्कार एक महिला म्हणून माझ्यासाठी नक्कीच प्रेरणादायी असून आतापर्यंत वीज महावितरण कंपनीमध्ये प्रामाणिकपणे केलेल्या कार्याची हीच पावती आहे.- उषा जगदाळे, वरिष्ठ तंत्रज्ञ आष्टी
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close