ताज्या घडामोडी

*अहमदनगर जिल्हा रुग्णालयात प्लाझ्मा थेरेपी साठीची यंत्रणा कार्यान्वित-जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी*

प्लाझ्मा दान करण्यासाठी कोरोनावर मात केलेल्या रुग्णांनी पुढे यावे

शेअर करा

 

अहमदनगर दि 29 जुलै टीमसीएम न्यूज

अहमदनगर जिल्हा रूग्णालयात प्लाझ्मा थेरेपी साठी आवश्यक यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यास अन्न व औषध प्रशासन आणि आयसीएमआर यांनी मान्यता दिली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर रुग्णांना फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी अन्य रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

 

हेही वाचा:बहुचर्चित नगरच्या उड्डाण पुलाच्या बांधकामास प्रारंभ;जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते उद्घाटन

बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान केला तर त्याचा उपयोग गंभीर कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचारासाठी होणार आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा. तेथील उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही त्यांचे समुपदेशन करून याचे महत्व पटवून द्यावे, असेही ते म्हणाले. यासाठी जिल्हा रूग्णालयात आवश्यक यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यास अन्न व औषध प्रशासन आणि आयसीएमआर यांनी मान्यता दिल्याचेही ते म्हणाले.

प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून ठिक झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात. प्लाझ्मा थेरपी फायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे.
प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठिक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त घेतलं जातं. रक्ताचा वापर करून अँटीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरीयाच्या संपर्कात येते तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि अँटीबॉडीज रिलीज होतात. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रूग्णांमध्ये प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात जे आधी कोरोनाशी लढलेले असतात.
जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांनी यासाठी पुढे येऊन प्लाझमा दान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close