ब्रेकिंग न्यूज
*पाथर्डी तालुक्यात दोन पोलिसांना कोरोनाची लागण*
शेअर करा
पाथर्डी दि 30जुलै टीमसीएम न्यूज
पाथर्डी शहरातील दोन पोलिस कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याने आता पोलिस ठाणेच अडचणीत आले आहे. आनंदनगर येथे राहणारा एक पोलिस कर्मचारी पोलिस ठाण्याच्या सरकारी वाहनाचा चालक आहे.
तर दुसरा पोलिस कर्मचारी नाथनगर येथे राहत असुन तो शेवगाव पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. गुरुवारी पाथर्डी येथे झालेल्या 57 जणांच्या तपासणीमधे दहा जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे, कोवीड सेंटरचे प्रमुख डॉ. महेंद्र बांगर यांनी दिली.
आज आलेले 10 मध्ये पागोरी पिंपळगाव 1,नाथनगर 5,आनंदनगर 1, वामनभाऊनगर 1,काटेवाडी 2 हे दहा रुग्ण येथील आहेत.
One Comment