ताज्या घडामोडीमराठवाडा

*तीनचाकीचे सरकारने दुधाला भाव द्यावा:आमदार सुरेश धस*

शेअर करा

 

कडा दि 1 ऑगस्ट टीमसीएम न्यूज


राज्यातील सरकार हे तीनचाकीचे सरकार असून,या तीनचाकी सरकारने दुधाला तीस रुपये प्रति लिटर भाव द्यावा अशी मागणी विधान परिषद सदस्य ,माजी मंत्री सुरेश धस यांनी केली .कडा येथे भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या दूध वाटप आंदोलनात ते बोलत होते.यावेळी दूध उत्पादक शेतकरी,सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे,उपसरपंच योगेश भंडारी उपस्थित होते.

दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्यावे आणि दूध दरवाढ करावी या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी सकाळ पासून भाजप च्या वतीने आंदोलनास सुरुवात झाली.कडा येथे विधान परिषद सदस्य सुरेश धस यांच्या उपस्थितीत हे आंदोलन सुरू झाले.
यावेळी बोलताना आमदार धस म्हणाले की,
महायुती सरकारच्या काळात दुधाला भाव देण्यात आला होता तसेच दुधाला अनुदानही देण्यात आले होते.मात्र या तीनचाकी सरकारला युरियाच्या संदर्भातील माहिती देण्यात आली होती.तरीही तुटवडा जाणवत असल्याचे त्यांनी सांगितलं.तर वर्षानुवर्ष शेतकऱ्यांची दैना जाणार कधी?असेही ते म्हणाले.

हेही वाचा:बीड जिल्ह्यात ४१६ कोरोना बाधित बरे;नव्याने ५० पॉझिटिव्ह आले

कडा येथे दुध वाया न घालवता नागरिकांना दूध वाटप करण्यात आले.दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या पातेल्यात दूध तापवून येणाऱ्या जाणारया नागरिकांना वाटप करण्यात आले .
विधान परिषद सदस्य सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध वाटप आंदोलन केले.

Advertisement
Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close