ताज्या घडामोडीमराठवाडा

*मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत दूध आंदोलन आणि रस्ता रोको*

शेअर करा

 

कडा दि 1 ऑगस्ट टीमसीएम न्यूज

दुधाला अनुदान मिळावे व भाववाढ मिळावी यासाठी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम संघटना,रयत क्रांती व रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दि.१ ऑगस्ट २०२० रोजी आष्टी तालुक्यातील कडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत दूध आंदोलन आणि रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी सुंगधी दुध वाटप करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले.

आष्टी तालुक्यातील कडा येथे माजी आमदार भिमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली दूध दरवाढी साठी आणि दुधाला अनुदान द्यावे या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले .यावेळी डॉ आंबेडकर चौकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक घालण्यात आला.त्यानंतर सुमारे अर्धा तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार भिमराव धोंडे यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर असताना शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले. दुधाला भाववाढ दिली होती. महाराष्ट्राचे नेते शरद पवार यांच्याकडे गेल्या ६० वर्षांपासून सत्ता आहे. परंतु त्यांनी दुष्काळी मराठवाड्यासाठी अद्यापपर्यंत कोणतीही कायमस्वरूपी विकासाची योजना आणली नाही असा आरोप धोंडे यांनी केला. राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा विभागाचे सरचिटणीस डॉ शिवाजी शेंडगे, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अशोक साळवे, शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, भाजपा किसान सभेचे अध्यक्ष बबन औटे,शंकर देशमुख , रघुनाथ शिंदे व इतर उपस्थित होते.

हेही वाचा:तीनचाकीचे सरकारने दुधाला भाव द्यावा:आमदार सुरेश धस

Advertisement
Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close