क्राईम

*फरारी आरोपीला पीपीई किट देऊन केलं अटक*

शेअर करा

 

बीड दि 2 ऑगस्ट टीमसीएम न्यूज

कोरोना केंद्रात काम करणाऱ्या डॉक्टरांना आपण पीपीई किट घातलेले पाहिले आहे,मात्र चक्क आरोपींना पीपीई किट घातल्याचे पहिल्यांदाच घडले आहे. कोरोना बाधित आरोपी पळून गेल्यावर त्याला आणण्यासाठी त्याला पीपीई किट देऊन पोलिसांच्या गाडी ऐवजी रुग्णवाहिकेतून आणण्यात आले.

Advertisement

आरोपी पकडण्याची ड्युटी असलेल्या पोलिसांना अनोख्या आरोपींना पकडण्याची वेळ आली.नेहमीप्रमाणे आरोपी पकडण्यासाठी लागणाऱ्या साहित्याबरोबर त्यांना आणखी साहित्य बरोबर न्यावं लागलं ते म्हणजे पीपीइ किट.हातात बंदुकांच्या ऐवजी हॅन्ड ग्लोज ,तर तोंडाला मास्क लावून काही अंतरावर असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला त्यांनी शिताफीने पकडले तेही संसर्ग न होता……

कोविड 19 केंद्रातून उपचार घेत असलेला आरोपी काही दिवसांपूर्वी बीडच्या कोविड केंद्रातून फरार झाला होता .
केज तालुक्यातील वडमाऊली दहिफळ येथील मंदिरातील पुजारी खुन प्रकरणी आरोपी रामा उर्फ रामेश्वर कल्याण काळे रा.आडाळा ता.कळंब जि.उस्मानाबाद यास पोलिसांनी अटक केली होती.त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असताना त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यामुळे त्याला उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयातील कोविड केंद्रात ठेवण्यात आले होते.मात्र आरोपी हा तेथून पळून गेला.

त्यानंतर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी कळंब येथील गायरानात लपून बसले असल्याचे कळले .मात्र कोरोना पॉझिटिव्ह आरोपीला पकडायचे कसे हा प्रश्न होता.त्यासाठी पोलिसांनी पकडण्यासाठी पीपीइ किट घेतले .स्वतः मास्क ,हॅन्ड ग्लोज घालून आणि काळजी घेत आरोपी आणि त्याच्या साथीदारांना घेराव टाकला .पीपीइ किट त्याच्या कडे फेकली आणि ती घालण्यास सांगितले.आरोपींनी पीपीइ किट घातल्यानंतर दवाखान्याची गाडी बोलावून त्यांना रुग्णवाहिका मधून थेट बीडच्या जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.

हेही वाचा;*मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत दूध आंदोलन आणि रस्ता रोको*

पोलीस अधीक्षक हर्ष ए पोद्दार,अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.भारत राऊत, यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.चे पो. उप.नि.संतोष जोंधळे, स्था.गु.शा.चे पोलीस कर्मचारी श्रीमंत उबाळे, विकी सुरवसे, वाहन चालक अविनाश घुंगरट विशेष पथकातील पोलीस कर्मचारी राहूल शिंदे, महेश भागवत, दिलीप गिते यांनी ही कामगिरी केली.

Advertisement
Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close