ताज्या घडामोडीमराठवाडा

*बीड जिल्ह्यात धक्कादायक,9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर*

शेअर करा

 

बीड दि 11 जुलै टीम सीएम न्यूज

बीड जिल्ह्यात कोरोनाचा धक्का बसत असून पॉझिटिव्हची  ९ आली आहे. सलग येत असलेल्या कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाची मोठी डोकेदुखी वाढली आहे.

बीड शहरात ६ कोरोना बाधित

बीड जिल्ह्यात आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णामध्ये बीड शहरातील संख्या सहा आहे.शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढत आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ राहत असलेली ३२ वर्षीय महिला भिवंडीहुन आलेली आहे.मिलीया कॉलेज जवळ किल्ला मैदान येथील  ७५ वर्षीय महिला करोना बाधित आढळून आली आहे.संभाजीनगर बालेपीर येथील ५६ वर्षीय पुरुष,

अजिजपुरा खंदक येथील ३३ वर्षीय पुरुष हा बाधित रुग्णाची सहवासातील आहे.राजीव नगर, धानोरा रोड येथील २८ वर्षीय पुरुष,पांडेगल्ली,बालीजी मंदीर जवळ येथील ३० वर्षीय पुरुष हा  पॉझिटिव्ह रुग्णाच्या सहवासातील आहे.

पुन्हा परळी एस बी आय बँकेतील एक बाधित

परळी शहरातील एसबीआय बँकेतील (रा.आझाद नगर) ६५ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.तो पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासातील आहे.

 

गेवराई येथील एक जण कोरोना बाधित

शहरातील मोमीनपुरा भागातील एक २४ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आढळून आला असून तो पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासातील आहे.

माजलगावातील एक कोरोना बाधित

माजलगाव येथील जुना मोंढा भागातील ५२ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली असून ती सांगलीहुन आलेली आहे.

आजचे स्वॅब :- ७१७ अहवाल प्राप्त :- २८६ प्रलंबित :- ४३१ पॉझिटिव्ह:- ९ निगेटिव्ह:- २६९ अनिर्णीत:- ८
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close