क्राईमताज्या घडामोडी
अण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले
शेअर करा
अहमदनगर दि 14 प्रतिनिधी
आदर्श गाव राळेगण सिद्धी मध्ये मतदारांना प्रलोभन देण्याचा प्रकार निवडणूक भरारी पथकाने रंगेहात पकडला.त्यामुळे अण्णांच्या राळेगणसिद्धीला गालबोट लागले आहे.
प्रचार संपल्यानंतर भरारी पथकाचे अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे साडेसहा वाजण्याच्या सुमारास सुरेश दगडू पठारे आणि मारुती पठारे यांना साड्या वाटप करताना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून १३६ साड्या जप्त करण्यात आल्या. त्यांना पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे नेण्यात आले. देवरे यांच्या आदेशाने बुगे यांनी महिलांसह ४ जणांविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही :कथित रेणू शर्माने आणखी कोणाला अडकवण्याचा केला प्रयत्न ?