ताज्या घडामोडीप.महाराष्ट्र

*अहमदनगर जिल्ह्यातील १० रुग्णांची कोरोनावर मात तर आणखी १२ नवे रुग्ण वाढले*

शेअर करा

 

अहमदनगर दि 28 जून टीमसीएम न्यूज

अहमदनगर जिल्ह्यातील १० रुग्णांनी आज कोरोनावर मात केली. तर नवीन १२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.

अहमदनगर जिल्ह्यातील १० रुग्णांनी आज कोरोनावर मात केली. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, संगमनेर ०५, नगर मनपा ०२, पारनेर, नगर आणि अकोले तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २८३ इतकी झाली आहे.

जिल्ह्यात आणखी १२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.यामध्ये संगमनेर तालुक्यातील ०६,नगर शहर ०२, भिंगार ०१ आणि नगर ग्रामीण ०१ तर अकोले आणि पारनेर तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.

संगमनेर तालुक्यात कुरण येथे ०२, पिंपरणे आणि साकुर येथे ०१ आणि संगमनेर शहरात हुसेननगर आणि लखमिपुरा येथे एक बाधित रुग्ण आढळून आला.
नगर शहरात सिद्धार्थ नगर, भिंगार, नवनागापुर आणि केडगाव येथे बाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी, केडगाव येथील रुग्ण ठाण्याहून आला होता .
पारनेर तालुक्यातील गोरेगाव आणि अकोले शहरातील कांदा मार्केट येथे प्रत्येकी एक बाधित रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील अक्टिव्ह रुग्ण संख्या आता ११३ झाली असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close