ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात २९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह*

शेअर करा

 

अहमदनगर दि 30 जून टीमसीएम न्यूज

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज दिवसभरात २९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. याशिवाय, पीएमटी लोणी आणि पुण्यातील खाजगी प्रयोगशाळा याठिकाणी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या १४ रुग्णांची नोंद जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्येत करण्यात आली आहे. यामध्ये दाढ (ता. राहाता) ०७, संगमनेर ०१, कोल्हार ०३, मजले चिंचोली (ता.नगर) ०१ आणि सारसनगर (नगर शहर) ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. सारसनगर आणि मजले चिंचोली येथील रुग्ण पुणे येथे उपचार घेत आहेत तर दाढ आणि कोल्हार येथील रुग्ण पीएमटी लोणी येथे उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या १४४
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३०७
जिल्ह्यातील एकूण नोंद रुग्ण संख्या: ४६५
मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या: १४

आज दुपारी एकूण १९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.
संगमनेर तालुक्यातील कुरण येथे ०३ व्यक्ती बाधित आढळून आल्या.
नगर शहरातील झारेकर गल्ली येथील ३२ वर्षीय व्यक्ती, बाग रोझा हडको येथील ३२ वर्षीय व्यक्ती, सुळके मळा येथील ३० वर्षीय पुरुष आणि २८ वर्षीय महिला, तोफखाना येथील ६ वर्षीय मुलगी, सिध्दार्थ नगर येथील ३८ वर्षीय पुरुष, माधवनगर कल्याण रोड येथील ४० वर्षीय महिला बाधित आढळून आली.
भिंगार येथील ३५ वर्षीय पुरुष, ४९ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय आणि ३८ वर्षीय महिला बाधित आढळून आले आहेत. याशिवाय आलमगीर (भिंगार) येथील ३० वर्षीय व्यक्ती बाधित आढळून आले आहेत.
श्रीरामपूर येथील ४८ वर्षीय पुरुष, पारनेर तालुक्यातील बाभूळ वाडी येथील ६२ वर्षीय पुरुष, जामखेड तालुक्यातील जायभाय वाडी येथील३२ वर्षीय व्यक्ती ( कल्याण वरून प्रवास करून आलेला) आणि शेवगाव तालुक्यातील आठेगाव येथील ३० वर्षीय महिला बाधित आढळून आले आहेत.
आज सायंकाळी एकूण १० व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.
जामखेड येथील ४२ वर्षीय पुरुष बाधित आढळून आला.
परळ (मुंबई) येथून पिंपरी पठार (पारनेर) येथे आलेला २८ वर्षीय पुरुष बाधित
*राजुरी (ता.जुन्नर, जि. पुणे) येथील ३६ वर्षीय पुरुष बाधित
नगर शहरातील बालिकाश्रम रोड बागवान मळा येथील एकाच कुटुंबातील ९ वर्षीय मुलगा आणि १२ वर्षीय मुलगी बाधित
नगर शहरातील चितळे रोड येथील ३६ वर्षीय पुरुष बाधित
श्रीरामपूर येथील ७० वर्षीय महिला बाधित
नगर शहरातील ढवण वस्ती येथील २८ वर्षीय पुरुष बाधित
श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील ५५ वर्षीय महिला बाधित
नगर शहरातील एकवीरा चौक पद्मा नगर येथील ७५ वर्षीय महिला बाधित.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close