ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*अहमदनगर जिल्ह्यात सायंकाळी वाढले ३० बाधित रुग्ण*

शेअर करा

अहमदनगर दि 10 जुलै टीमसीएम न्यूज

आज येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये सायंकाळी १५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये, नगर महापालिका क्षेत्रातील ०३, भिंगार ०२, संगमनेर ०७, अकोले ०१, श्रीरामपूर ०१ आणि नगर ग्रामीण ०१ बाधित आढळून आले. याशिवाय, खाजगी प्रयोगशाळेत १५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.यामध्ये नगर मनपा ०८, राहाता ०४ नगर ग्रामीण ०२ आणि संगमनेर येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर महापालिका क्षेत्रात पद्मा नगर येथे ०१, भिंगार ०१, सूडके मळा येथे ०१ रुग्ण आढळून आला.
संगमनेर तालुक्यात कनोली येथे ०४, ढोलेवाडी येथे ०३ रुग्ण आढळून आले.
अकोले तालुक्यातील देवठाण येथे एक रुग्ण आढळला. श्रीरामपूर येथे एक रुग्ण आणि नगर येथील के. के. रेंज येथे ०१ रुग्ण आढळून आला.भिंगार येथे ०२ रुग्ण आढळून आले.

याशिवाय, खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये महापालिका क्षेत्रात माळीवाडा ०१, माणिक नगर ०१, नंदनवन नगर (सावेडी) ०१, भिडे चौक (सावेडी)०१, बिशप लॉईड कॉलनी ०१, तोफखाना ०१, वाग रोजा हडको ०१, भिस्तबाग रोड, सावेडी ०१ असे रुग्ण आढळले. तसेच नगर ग्रामीण भागात वाघ मळा, वडगाव गुप्ता येथे ०१ आणि विळद घाट येथे ०१ रुग्ण आढळला.
राहाता तालुक्यातील कोल्हार येथे ०४ रुग्ण आढळले तर संगमनेर येथे एक रुग्ण आढळला.

• उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या: २९३
• बरे झालेले रुग्ण: ५२९
• मृत्यू: २०
• एकूण रुग्ण संख्या: ८४२

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close