*बीड जिल्ह्यात आता लग्न समारंभास फक्त 10 लोकांची अट*
50 व्यक्तीच्या उपस्थितीचा निर्णय 10 वर
बीड दि 12 जुलै टीम सीएमन्यूज
बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.यावर नियंत्रण मिळविण्यासाठी लग्नातील उपस्थितांवर निर्बंध घातले असून आता फक्त 10 लोकांमध्ये लग्न लावता येणार आहे.
यापूर्वी बीड जिल्ह्यात लग्नासाठी 50 व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न सोहळ्याला परवानगी देण्यात आली होती .मात्र जिल्हा प्रशासनाने नवीन निर्देश जारी करून 10 लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळ्यासाठी परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. लग्न समारंभाच्या ठिकाणी कोरोना विषयक सामाजिक अंतराचे पालन करण्याच्या अटीवर विवाह सोहळ्यास परवानगी देण्यात येत आहे. प्रत्येक विवाह सोहळ्याची माहिती लेखी स्वरूपात किमान तीन दिवस आधी आयोजकांनी संबंधित पोलिस स्टेशन, ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत यांना लेखी स्वरूपात देणे बंधनकारक राहील. तसेच विवाह सोहळ्यात सर्व नियमांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी मुख्याधिकारी ग्रामसेवक यांची राहील त्यामुळे आता यापुढे 50 लोकांच्या उपस्थितीत नव्हे तर फक्त 10 लोकांच्या उपस्थितीत लग्न करावे लागणार आहे.