*बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढला; दुपारपर्यंत 303 बाधित*
बीड दि १७ सप्टेबर प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील कोरोना चाचणी मोहीम जशी गती घेत आहे तसे बाधितांचा आकडा वाढत आहे.कोरोना गायब झाल्याचे चित्र मध्यंतरी होते मात्र ते छुपे असल्याचे या आकडेवारी मुळे उघड झाले आहे. गावागावात कोरोना छुपे वास्तव्य करत असल्याचे या तपासण्यामधून बाहेर पडत आहे. १७ सप्टेबर रोजी दुपारी आलेल्या अहवालात 303 कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बीड जिल्ह्यातील ३३४८ रुग्णांचा कोरोना अहवाल आज प्राप्त झाला. त्यामध्ये 303 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर ३०४५ रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.
बीड जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण डोंगरकिन्ही या गावात २१ आढळून आले आहेत. त्यानंतर कुसळम्ब येथे १३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. बीड जिल्हा रुग्णालयात ३ , कडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ०१ ग्रामीण पोलीस स्टेशन अंबाजोगाई येथे ०३ तहसील कार्यालय अंबाजोगाई येथे ०१ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
आष्टी तालुक्यातील एकूण १५ कोरोना बाधित रुग्णांपैकी टाकळसिंग येथे ०६ , कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कडा येथे ०१ सुंदरनगर येथे ०३, ग्रामपंचायत कार्यालयासमोर ०१ असे ०५ जण कोरोना बाधित झाले आहेत. धानोरा येथील जनता वसतिगृह जवळ ०१ , वटनवाडी येथे एक, खुंटेफळ येथे एक , मंगरूळ येथे एक अशा एकूण १५ बाधितांचा समावेश आहे.
हेही वाचा :नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात संबंधितांचे मत जाणून घेण्याची राज्यपालांची सूचना*
कोणत्या तालुक्यात किती ?
अंबाजोगाई २०, आष्टी १५ , बीड ५७ ,धारूर ५१ गेवराई १७ केज २४ ,माजलगाव १२ परळी २० पाटोदा ६१ शिरूर कासार ११ वडवणी १५ असे एकूण 303 रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक आकडा हा पाटोदा तालुक्याचा असून आतापर्यंतचा हा तालुक्याचा उच्चांक आहे.