ताज्या घडामोडीशैक्षणिक

*या ‘जिल्ह्यात’ सर्व शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याचे निर्देश*

शेअर करा

 

अकोला दि 15 प्रतिनिधी
आज पासून अकोला जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी शाळेत उपस्थित रहावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज दिले.
पालकमंत्री ना. कडू यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात विविध विषयाच्या आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे इयत्ता पाचवीचे वर्ग पालकमंत्री यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हा परिषद शाळा हातोला, ता.बार्शिटाकळी, पातुर नंदापूर ता.अकोला, किनखेड ता.अकोट, रिधोरा ता.बाळापूर, राजणापूर ता. मुर्तिजापूर, बाभुळगाव आणि चतारी ता. पातुर, माळेगाव बाजार ता. तेल्हारा येथे ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आले. या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांना शिक्षक मित्र व शिक्षकांच्या मदतीने मोबाईल, टिव्ही व रेडीओव्दारे अध्यापन व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती शिक्षणाधिकारी यांनी दिली.

ज्या शाळेतील वर्गाची पटसंख्या 10 आहे अशा शाळेत प्रत्यक्ष अध्यापन सुरु करण्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहून दोन पाळीमध्ये शाळा सुरु करावी. पाच विद्यार्थ्यांचा गट करुन सकाळी 11 ते दोन व दुपारी दोन ते पाच अशा वेळेत त्यांना शिकवावे. यासाठी सामाजिक अंतर राखून तसेच शाळेचे निर्जंतुकीकरण शाळा सुरु होण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतर करावे, तसेच शिक्षकांनी कोरोना तपासणी करुन घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हा परिषद तसेच नगर परिषदेच्या शाळेत येत्या सोमवारी सर्व शिक्षकांनी उपस्थित रहावे, असे निर्देश पालकमंत्री ना. कडू यांनी दिले. शाळा कशा प्रकारे ऑनलाईन किवा ऑफलाईन पद्धतीने सुरु होवू शकतात, यासाठी नियोजन करावे. शाळेतील विद्यार्थी व पालक यांना भेटून त्यांचे मनोबल वाढवावे, अशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी आ. नितीन देशमुख,
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक वैशाली ठक, तसेच अन्य विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close