fbpx
ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*अयोध्या येथील राम मंदिराच्या पुढील योजनांच्या संदर्भात दिल्ली बैठकीचे भास्करगिरी महाराजांना निमंत्रण*

शेअर करा

 

नेवासा दि 8 नोव्हेंबर, प्रतिनिधी

Advertisement

अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिराच्या पुढील योजनांच्या संदर्भात विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाची विचार विनिमय करण्यासाठी दि.१० नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे बैठक महत्वपूर्ण बैठक होत असून श्री क्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराजांना विश्व हिंदू परिषदेचे मार्गदर्शक मंडळाचे सदस्य म्हणून निमंत्रण देण्यात आले आहे.या बैठकीला भास्करगिरी महाराज दिल्ली येथे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.ही बैठक दि.१० व ११ नोव्हेंबर अशी दोन दिवस चालणार आहे.
या बैठकीच्या संदर्भात विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलिंद परांडे,केंद्रीय मंत्री अशोक तिवारी,उपाध्यक्ष जिवेश्वर मिश्र यांनी आपल्या स्वाक्षरीद्वारे गुरुवर्य भास्करगिरी महाराजांना निमंत्रण दिले असून या दिलेल्या निमंत्रण पत्रात म्हटले आहे की प्रभू श्रीरामचंद्राच्या अयोध्या येथील नियोजित मंदिराचा शुभारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.५ ऑगस्ट रोजी पार पडले.त्यामुळे संपूर्ण विश्वातील हिंदू समाजामध्ये नवीन उत्साह निर्माण झाला असून मंदिर निर्माणचे कार्य ही हळुहळु प्रगती करीत आहे.
अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्मितीच्या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी दि.१० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता बैठकीचे पहिले सत्र पार पडणार आहे.तर बुधवार दि.११ नोव्हेंबर रोजी बैठकीचे दुसरे सत्र सकाळी ९ वाजता होणार आहे.मंदिर निर्मितीसाठी अजून काय उपाययोजना करता येईल या करिता सूचना करण्यासाठी दिल्ली येथे होणाऱ्या नियोजन बैठकीस आपण उपस्थित राहून सूचना कराव्यात अशी विनंती विश्व हिंदू परिषदेचेL महामंत्री मिलिंद परांडे,केंद्रीय मंत्री अशोक तिवारी व उपाध्यक्ष जिवेश्वर मिश्र यांनी निमंत्रण पत्रात केली आहे.

 

हेही वाचा:*80 झाले बीड जिल्ह्यात कोरोना बाधित;आष्टीची संख्या वाढली

 

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close