ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*जामखेडचा प्रसिद्ध आठवडी भाजी बाजार आणि बैलबाजार शनिवार पासून सुरू*

शेअर करा

जामखेड दि 16 ,प्रतिनिधी
मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या जामखेड मधील बैलबाजार आणि आठवडी बाजार शनिवार पासून सुरू होणार असल्याची माहिती जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी मीनानाथ दंडवते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
जामखेड येथील जनावरांचा बाजार बैलांसाठी प्रसिद्ध आहे .उस्मानाबाद,बीड या जिल्ह्यातील पशुधन विक्रेते आपले पशुधन या बाजारात विक्रीसाठी आणतात.टाळेबंदीमूळे हा बाजार बंद होता .राज्य शासनाने टाळेबंदी उठविल्या मुळे जिल्हाधिकारी यांनी आठवडी बाजारासाठी परवानगी दिल्यानंतर शनिवारी बाजार भरत आहे .
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बैलबाजार भरणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे. बाजारासाठी आरोग्य विषयक बाबींचा वापर करायचा आहे.

Advertisement

हेही वाचा:अहमदनगर शहरात गुटखा विक्रेत्यावर छापा;प्रतिबंधित गुटख्यासह एक जण अटकेत

बाजारात सर्वानी 6 फुटाचे शारीरिक अंतर ठेउन खरेदी विक्री करावी.सर्वानी मास्क लावणे बंधनकारक आहे.विक्रेत्यांनी सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे.गर्दी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.बाजारात थुंकण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे .

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: