ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

*मालेगाव तालुक्यातील जवान गलवान खोऱ्यात शहीद*

शेअर करा

 

नाशिक दि 25 जून टीम सीएमन्यूज

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील निमगोले येथील जवान चीनच्या सीमेवर शहीद झाल्याची माहिती मिळाली असून सचिन विक्रम मोरे असे या जवानाचे नाव आहे. काल रात्री चीनच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना त्याला वीरमरण प्राप्त झाले .दोन दिवसांनी त्यांचे पार्थिव आधी पुणे येथे नंतर नाशिकहून त्यांच्या मूळगावी पोहोचविण्यात येणार असल्याचे समजते.
गलवान परिसरात एका पुलाचे काम सुरु होते. याच वेळी नदीला पाणी सोडल्यामुळे तीन जवान वाहून चालले होते. त्यांच्या वाचविण्याच्या प्रयत्नात विक्रमने नदीत उडी घेतली. परंतु नदीतील दगडावर तो कोसळल्याने तो शहीद झाल्याची माहिती विक्रमच्या कुटुंबियांना लष्करी अधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरून दिली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, सध्या भारत आणि चीन सीमेवर गलवान परीसरात तणावाचे वातावरण आहे. याठिकाणी दोन्ही देशांकडून रस्त्याचे बांधकाम सुरु आहे. याच ठिकाणी भारताकडून एक पूल बांधणीचे काम सुरु होते. याच वेळी नदीत पाणी सोडल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.
विक्रमचे पार्थिव उद्या निघणार असून रात्रीपर्यंत पुणे येथे पोहोचेल. त्यानंतर पुण्याहून हे पार्थिव नाशिकमध्ये येईल. व नाशिकमधून पार्थिव मालेगाव तालुक्यातील निमगोले या मूळगावी शनिवारी 27 रोजी सकाळी पोहोचण्याची शक्यता आहे.
विक्रम 17 वर्षापासून भारतीय सेनेत कार्यरत होते. ते इंजिनिअर होते. मागील एक वर्षापासून भारत-चीन सीमेवर तैनात होते. सीमेवर पूल, व रस्ते बनवण्याचे काम सुरू असतांना अचानक चीनकडून नदीत पाणी सोडण्यात आल्यामुळे काही जवानांना वाचविण्याच्या प्रयत्नात विक्रम यांना वीरमरण आले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close