ताज्या घडामोडी

कलासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन

शेअर करा

संगमनेर प्रतिनिधी

तमाशा क्षेत्रातील कला सम्राज्ञी म्हणून ज्यांची ओळख आहे अशा कांताबाई सातारकर यांचे वयाच्या 82 व्या वर्षी संगमनेर येथे राहत्या घरी निधन झाले.
काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्यावर संगमनेर येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाचा पहिला विठाबाई नारायणगावकर तमाशा पुरस्कार हा कांताबाई सातारकर यांना 2005 मध्ये प्रदान करण्यात आला होता.
त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार पटकावले .दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये तंबू उभा करून तमाशा दाखवण्याचा बहुमान मिळाला होता.
त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा कलाभूषण रघुवीर खेडकर आणि तीन मुली आहेत.

भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांची आदरांजली

जेष्ठ तमाशा कलावंत श्रीमती कांताबाई सातारकर यांच्या निधनान कलाक्षेत्राची अपरीमीत हानी झाली आहे.पारंपरिक कलेची जोपासना करणाऱ्या तमाशा सम्राज्ञीस महाराष्ट्र मुकला असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

आपल्या शोकसंदेशात आ.विखे पाटील यांनी म्हणले आहे की,अतिशय खडतर आणि संघर्षमय आशा वाटचालीतून तमाशा कलेची जोपासना करून कांताबाईनी अवघ्या ग्रामीण महाराष्ट्राला आनंद मिळवून देताना स्वतःचे दु:ख कधी जाणवू दिले नाही.

कांताबाईसह कुटुंबियांनी या कला क्षेत्रात स्वतःला झोकून देताना सहकारी कलावंताना कौटुंबिक मायेने त्यांनी आधार दिला.पारंपरिक कलेला जिवंत ठेवण्याचे केलेले काम नगर जिल्ह्य़ाचा नावलौकीक वाढविण्यास कारणीभूत ठरले.

कलाक्षेत्रातील त्यांच्या या योगदानाचा गौरव म्हणून पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय कलागौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्याचे भाग्य प्रवरा परीवाराला मिळाल्याची आठवण आ.विखे पाटील यांनी आवर्जून सांगितली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close