ताज्या घडामोडीप.महाराष्ट्र

Karjat *खेड चेक पोस्ट वर पोलिसांची ऊसतोड कामगारांना मारहाण-आ. सुरेश धस यांचा आरोप* 

शेअर करा

आष्टी दि 2 एप्रिल ,टीम सीएमन्यूज

आष्टी तालुक्यातील खलाटवाडीसह अनेक भागातील ऊसतोड कामगारांना अहमदनगर जिल्ह्यातील खेड ता.कर्जत येथे भिगवण पोलिसांकडून अमानुष मारहाण झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
खलाटवाडीसह परिसरातील ऊसतोड कामगार खेडच्या (ता.कर्जत) सीमेवर काल (दि.१) सकाळपासून थांबलेले होते. त्यांना तेथील जिल्ह्यात प्रवेश नाकारण्यात आला.
तिथपर्यंत ठीक होतं. परंतु भिगवण पोलिसांनी त्यांना अमानुष मारहाण केली. हा गंभीर प्रकार असून ऊसतोड कामगारांना मारहाण करणे कुठल्या नियमात बसते? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. मारहाण करणार्या पोलिसांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
याशिवाय राज्य शासनाने सांगितल्याप्रमाणे ऊसतोड कामगारांच्या सोयीची जबाबदारी कारखान्याची आहे. असे होते तर मग ऊसतोड
कामगारांना बाहेर जाऊच का दिले? याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिवांनी एकदाच काय तो निर्णय घ्यावा, हे
काय लावलंय? अशा शब्दात संताप व्यक्त केला. दरम्यान, ऊसतोड कामगारांबद्दलचा निर्णय लवकरात लवकर घेऊन सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आ.धस यांनी केली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close