ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बिबट्याला पकडण्यासाठी उभा ऊस पेटविला,मात्र बिबट्या सापडेना,निसटला?

शेअर करा

बिबट्याला पकडण्यासाठी उभा ऊस पेटविला,मात्र बिबट्या सापडेना

करमाळा दि 7 डिसेंबर प्रतिनिधी

 

करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथे ऊसतोडणी मजुराच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केल्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी किंवा ठार मारण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील आहे.त्यासाठी येथील शेतातील उभा ऊस पेटून दिला आहे.

ऊसतोडणी कामगाराच्या नऊ वर्षाच्या मुलीवर हल्ला केल्यानंतर तिचा मृत्यू झाला.
चिखलठाण येथे केडगाव शेटफळ सीमेवरती राजेंद्र बारकुंड यांच्या शेतामध्ये सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.त्यांनतर या बिबट्याला शोधण्यासाठी वन विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे .हा बिबट्या उसाच्या फडात घुसल्याने हा ऊस पेटवून देण्यात आला.
करमाळा तालुक्यातील ही तिसरी घटना आहे. आता पर्यत बिबट्याने प्रत्येक दुसऱ्या दिवशी हल्ला केला आहे. लिंबेवाडी अंजनडोह नंतर आता चिखलठाण परिसरात बिबट्याचा वावर हा स्पष्ट दिसून येत आहे. याठिकाणी आठ ते नऊ वर्षाच्या उस टोळीतील लहान मुलीला बिबट्याने उचलून नेले. प्रयत्न केला या झटापटीत तिला त्यांनी ओढत उसाच्या शेतामध्ये घेऊन गेल्यानंतर जखमी केले. तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिचा मृत्यू झाला.
फुलबाई अरचंद कोडली असे या मृत मुलीचे नाव असून ती दुसाने तालुका साक्री जिल्हा धुळे येथील रहिवासी आहे.ऊसतोडणी चालू असताना ती इतर मुलीबरोबर खेळत होती .

हेही वाचा:बिबट्याचा हल्ल्यात ऊसतोडणी कामगारांची मुलगी ठार

लोकांनी पळून लावल्यामुळे अजूनही बिबट्याला अपेक्षित भक्ष मिळाले नाही. तरी अजूनही चिखलठाण व परिसरामध्ये दुसऱ्यांदा बिबट्याचा हल्ला होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close