त्या नरभक्षक बिबट्याने तीन गोळ्या हुकविल्या;शोध मोहीम सुरू
त्या नरभक्षक बिबट्याने तीन गोळ्या हुकविल्या;शोध मोहीम सुरू
करमाळा दि 11 डिसेंबर,प्रतिनिधी
करमाळा तालुक्यात तीन जणांचे बळी घेतलेल्या नरभक्षक बिबट्या आता वन विभाग आणि शार्प शूटरच्या टप्प्यात आला.
बिटरगाव मध्ये केळीच्या बागेत लपलेल्या बिबटयावर तीन फायर करण्यात आले .मात्र त्याने गोळ्या हुकवून तो उसाच्या शेतात पसार झाला.
राज्यातील चार जिल्ह्यात माणसे मारणाऱ्या नरभक्षक बिबट्याने सोलापूर जिल्ह्यात तीन व्यक्तीवर हल्ला करून ठार केल्यानंतर तो वांगी येथील उजनीच्या काठच्या परिसरात फिरत आहे. हा बिबट्या बिटरगाव वांगी परिसरात ठाण मांडून आहे.या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने जंग जंग पछाडले असून त्यासाठी दीडशेहून कर्मचारी कार्यरत आहेत तर पाचहून अधिक शार्प शूटर या बिबट्याचा शोध घेत आहेत.
आज सायंकाळी बिबटयाला बिटरगाव वांगी परिसरात शोधत असताना तिथे एका केळीच्या बागेत असल्याचे लक्ष्यात येताच वन विभागाने आखणी करत चोहो बाजूने घेरले.शार्प शुटर ने तीन गोळ्या झाडण्यात आल्या मात्र त्या गोळ्या हुकवून बिबट्या उसाच्या शेतात पळाला .आता या उसाच्या शेताला घेराव करून बिबट्याला शोधण्यासाठी मोहीम सुरू आहे.
उजनी परिसरातील हा भाग असून धरणाच्या अलीकडचा भाग आणि कडेचा भाग असल्याने बिबट्याला पुढे जाण्यास पाण्यामुळे अडचण येणार आहे.त्यामुळे येथे हा बिबट्या वन विभागाच्या तावडीत जिवंत किंवा मृत अवस्थेत मिळणार असल्याचे येथील नागरिकांचे मत आहे.
या बिबट्याला पकडल्याची किंवा मारल्याची बातमी मिळण्यास जास्त वेळ लागणार नाही.
हेही वाचा:विहिरींनाचा प्रस्ताव न देणाऱ्या सरपंचाचा सत्कार करणार