ब्रेकिंग न्यूज

*थरार!!शेतीच्या वादातून तिघांचा खून*घटनास्थळी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची भेट*

शेअर करा

 

केज दि 14 मे टीम ,सी एम न्यूज

कोरोना विषाणूच्या काळात गुन्ह्यांचे प्रमाण थांबताना दिसत नाही .केज तालुक्यातील मांगवडगाव येथे शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांचा खून झाल्याची घटना घडली .ही घटना 13 ला रात्री घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा सामूहिक हल्ल्यातून तिघांचा खून झाला असून अन्य एक जखमी आहे. यात तिघांचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे. केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह रुग्णालयात पाठविले. अन्य एकास रुग्णालयात उपचारार्थ पाठविले आहे.
याप्रकरणी १७ आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली .घटनास्थळाला त्यांनी पहाटे तीन वाजता भेट देऊन पाहणी केली . यावेळी अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक राहूल धस ,केजचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, युसूफ वडगावचे सपोनि. आंनद झोटे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: