fbpx
ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*बिबट्याला ठार करा अथवा जेरबंद करा:आमदार मोनिका राजळे यांची मागणी*

शेअर करा

 

अहमदनगर दि 30 प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यात नरभक्षक बिबट्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात 3 मुलांचा बळी गेला आहे. यापार्श्वभूमीवर नरभक्षक बिबट्याला ठार करावे अथवा जेरबंद करावे अशी मागणी आ.मोनिका राजळे यांनी केली आहे.

आ.राजळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेवून याबाबतचे निवेदन दिले. यावेळी पंचायत समिती सभापती गोकुळ दौंड, जि.प.सदस्य राहुल राजळे, पुरुषोत्तम आठरे, विष्णूपंत अकोलकर, सुनिल ओहोळ, सुनिल परदेशी, काकासाहेब शिंदे, एकनाथ आटकर, सुभाष केकाण आदी उपस्थित होते.

हेही वाचा:नगर वन विभागाच्या मदतीला जळगाव, यावल आणि नाशिक येथील पथक

तालुक्यातील मौजे केळवंडी, मढी, कासार पिंपळगाव, शिरापूर बुधवंत वस्ती या भागात बिबट्याने हल्ला केल्याचे प्रकार घडले आहेत. कासार पिंपळगाव, जवखेडे, तिसगाव, धामणगांव, रांजणी, केळवंडी, माणिक दौंडी , वृध्देश्वर डोंगर परिसर, मायंबा डोंगर परिसर या परिसरातही बिबट्याने शेतकर्‍यांकडील अनेक पाळीव जनावरे फस्त केली आहेत. बिबट्याला नरभक्षक बनल्याने नागरिकांमध्ये भितीचे व घबराटीचे वातावरण आहे. वन विभाग व प्रशासनाकडून फक्त आश्वासने दिली जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या संतापाला व रोषाला आवरणे कठीण बनले आहे. वन विभागाने जुजबी उपाययोजना न करता नरभक्षक बिबट्याला शोधून जेरबंद करावे किंवा त्याला ठार मारावे यासाठी अनुभवी अधिकारी, तज्ज्ञ यांची मदत घ्यावी. अन्यथा नागरिकांच्या संतापास आवर घालणे कठीण होणार असल्याचे आ.राजळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close