अहिल्यानगर
ladki bahin yojna update राज्यातील मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचं आणि कोणाला काढायचं याचा निर्णय मुख्यमंत्री यांच्यासह घटक पक्षाचे मंत्री म्हणून मी अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकत्र मिळून घेत असल्यामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातील निर्णय आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाची संदर्भातला निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरच होऊ शकतो असे सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. लाडकी बहिण योजनेचा गैरफायदा घेतलेल्यांवर कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मागच्या निवडणुकीच्या आधीच्या काळात ही योजना गरीब लाडक्या बहिणींच्या करता आणलेली ही योजना असून ज्यांचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे अशा लाडक्या बहिणीसाठी पुढे चालू ठेवायची आहे. ,काहींनी चुकीचा गैर अर्थ काढून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या मध्ये नोकरदार भगिनी होत्या त्याची माहिती काढायला सांगितली आहे,ते तपासायला सांगितले आहे यामध्ये पुरुषांचा समावेश होता असे ही पुढे आले आहे. तो वसूल करण्याच्या दृष्टीने कायद्याने पाऊले उचलणार आहे असेही त्यांनी सांगितले.