fbpx
ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*बिबट्याने तीन वर्षांच्या मुलास शिरापूर मधून पळविले;नागरिक भयभीत*

शेअर करा

 

तिसगाव दि 29 प्रतिनिधी

Advertisement

तालुक्यातील बिबट्याने दोन बालकांना उचलून नेऊन हत्या केल्याची घटना ताजी असताना शिरापूर येथील संजय मुरलीधर बुधवंत यांचे २/३ वर्षाचे मुल बिबट्याचे उचलून डोंगरात नेल्याची घटना सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली .यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

पाथर्डी तालुक्यातील केळवंडी आणि मढी येथील दोन बालकांना बिबट्याने पळविल्याची घटना मागील आठवड्यात घडली .त्यानंतर तिसगाव वन विभागाने दक्षता घेत सावरगाव येथे लावला.पण या बिबट्याने सायंकाळी शिरापूर येथे बुधवंत यांच्या घरी दोन ते तीन वर्षांचे मूलं बिबट्याने पळविल्याची घटना घडली .या मुलाचा सध्या शोध सुरू आहे.
गर्भगिरी डोंगरात या बिबट्याचे वास्तव्य असून कधी तो आष्टी तालुक्यात तर कधी पाथर्डी तालुक्यात वावरत आहे.दोन मुलांचा जीव घेतल्यानंतर हा बिबट्या नरभक्षक बनला की काय अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत.
या भागात रानटी जनावरांचा वावर असूनही बिबट्या मनुष्य वस्तीत का घुसला असा प्रश्न आहे.सध्या वन विभागाने त्याच्यासाठी पिंजरा लावला खरा पण कधी अडकणार ? हा प्रश्न आहे आणि किती बळी घेणार?असा सवाल आहे.

हेही वाचा:नगर-जामखेड रस्ता;आष्टी तालुक्यातील रस्त्याला कधी निधी मिळणार?

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close