ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*बिबट्याचा लहान मुलावर प्राणघातक हल्ला*

शेअर करा

 

 

पाथर्डी दि 22 प्रतिनिधी
तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील भगत वस्ती परीसरात उमेश भगत या सहा वर्षाच्या लहान मुलावर आज (ता 22) शनिवार रोजी सायंकाळी  6.30 वाजेच्या सुमारास बिबट्याने प्राणघातक हल्ला केला.

उमेश आजी बरोबर जात असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला व त्याला उचलून शेजारी असणाऱ्या उसाच्या शेतात नेले त्याच वेळी आजी व घरातील व शेजारील माणसांनी बिबट्या मागे धाव घेतल्यानंतर बिबट्याने उमेशला उसात सोडून पळ काढला.

घटनेत उमेशने शौर्य,आत्मविश्वासाने बिबट्याचा प्रतिकार केला.बिबट्याचा प्रतिकार करत असताना उमेश जखमी झाला असून त्याला अहमदनगर येथे  रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

वनविभाग कर्मचाऱ्यांनी यावेळी शेत शिवारात बिबट्याचा वावर असणाऱ्या परीसरात विशेष लक्ष देवून बिबट्याला जेरबंद करावे.अशी मागणी परीसरातील ग्रामस्थाकडून होत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close