ताज्या घडामोडीमराठवाडा

बिबट्याने पारगाव ची जागा सोडली ? ;आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा

शेअर करा

आष्टी दि 1 डिसेंबर

दोन दिवसांपूर्वी पारगाव जोगेश्वरी येथे बिबट्याने महिलेची हत्या केल्यानंतर तो आज पर्यंत वन विभागाच्या हाती लागला नाही.आज त्याचे अस्तित्वाचा मागमूस न आढळल्याने ह्या बिबट्याने जागा सोडली असावी असा अंदाज व्यक्त होत असून वन विभागाने आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

 

दोन दिवसांपूर्वी आष्टी तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी येथे सुरेखा निळकंठ भोसले या महिलेवर हल्ला केला.यामध्ये या महिलेचा मृत्यू झाला.त्यांनतर वन विभागाने या ठिकाणी पिंजरे बसविले, तसेच ग्रामस्थांच्या मदतीने सर्व परिसर शोधून काढला पण या बिबट्याने पुन्हा गुंगारा दिला.शंभरहून अधिक कर्मचारी या ठिकाणी कार्यरत होते.घटना घडली त्या परिसरात पिंजरे लावून त्यामध्ये ट्रांक्युलयझर टीम चे शूटर बसविण्यात आले होते.बिबट्यासाठीचे भक्ष बोकड पिंजऱ्या बाहेर ठेऊन त्याला बेशुद्ध करण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत होती.बिबट्याला चकविण्यासाठी मनुष्याचे बाहुल्या तयार करून विविध ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या.मात्र या सर्व उपायांना बिबट्याने गुंगारा दिला आहे.
घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा बिबटया जवळच्या ओढ्यावर आला असल्याचे ठसे वन विभागाला आढळून आले .तसेच या भागात परत आल्याचे अनेकांनी पाहिले.मात्र तिसऱ्या दिवशी याचा कुठलाही मागमूस आढळून आला नाही.त्यामुळे एकूणच या बिबट्याने या भागातील रहिवास बदलला असावा असा कयास आहे.आजूबाजूच्या गावात आणि पारगाव मध्ये लाऊड स्पीकरच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे .पारगाव,बळेवाडी, जामगाव, वाळुंज, खडकत, डोनगाव या गावांचा समावेश आहे.

हेही वाचा:होता पुतण्या म्हणून वाचली काकू!

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close