ताज्या घडामोडीप.महाराष्ट्र

*पुन्हा कोयता बंद करू आ. सुरेश धस यांचा साखर कारखानदारांना इशारा*

शेअर करा

 

 

आष्टी दि 13 प्रतिनिधी

पुन्हा कोयता बंद करू आ. सुरेश धस यांचा साखर कारखानदारांना इशारा दिला आहे.
ऊसतोड कामगारांना माणूस म्हणून जगवा त्यांच्या आरोग्यासाठी सार्वजनिक शौचालयात तयार करा.संडास सफाई कामगार यापेक्षा वाईट अवस्था असलेल्या मजुरांना कमीत कमी चारशे रुपये रोजंदारी येण्यासाठी ८५% भाव वाढणे आवश्यक असल्याने डिसेंबर महिना अखेरपर्यंत मुदत देऊ परंतु कारखानदारांनी व राज्यकर्त्यांनी कारभार सुधारला नाही तर जानेवारी महिन्यापासून पुन्हा कोयता बंद करण्यात येईल असा इशारा ऊसतोड मजुराचे नेते आ.सुरेश धस यांनी दिला आहे.

हेही वाचा:दिवाळी तुमची दवाखान्यात जाणार काय?आज जिल्ह्यात 200 कोरोना ग्रस्तांची भर

यंदाची दिवाळी बरोबर साजरे करण्यासाठी उसाच्या फडात जाऊन ते त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यासाठी विघ्नहर कारखाना, भीमाशंकर कारखाना, पराग कारखाना, सोमेश्वर कारखाना, साखरवाडी कारखाना,माळेगाव कारखाना, भवानीनगर कारखाना या कारखान्याच्या फड व थळाच्या ठिकाणी भेट देत असताना या ठिकाणी घोडगंगा जि. पुणे सहकारी कारखान्यावर मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत गोपीनाथराव मुंडे ऊसतोड मजूर मुकादम वाहतूकदार संघटनेचे सचिव सुखदेव सानप उपस्थित होते.
आ.सुरेश धस पुढे बोलताना म्हणाले की, कारखानदारांनो आपण जाणते आहात, आमची विनंती मान्य करा कोयता बंद झाल्यास दोघांचेही नुकसान करू नका…
या ऊसतोड मजुरांनाच्या जीवनात दिवाळी नाही, पाडवा नाही, भाऊबीज नाही त्यांना त्यांच्या मेहनतीचे पैसे योग्य पद्धतीने दिले पाहिजेत. मुकादमाकडून घेतलेली उचल फिरली पाहिजे त्यासाठी सध्याचे भाव काही कामाची नाही उचल फिटण्यासाठी ८५ टक्के भाववाढ मिळाली पाहिजे.मजुरांचे आरोग्य महिला भगिनींची प्रतिष्ठा राखण्यासाठी सार्वजनिक शौचालय नसल्याचे दिसून येत आहे.महिलांचे रक्तातील हिमोग्लोबिन तपासणी करण्यात येत नाही. आजारी महिलादेखील रात्रंदिवस काम करत आहेत. त्यांच्या जीवनात एक वेळ देखील ताजे शिजलेले अन्न मिळत नाही. रात्रीचे शिळे अन्न दुसरे दिवशी दिवसभर खावे लागते आहे. त्यामुळे ८५ टक्के भाववाढ मिळालीच पाहिजे अन्यथा जानेवारीमध्ये पुन्हा कोयता बंद ठेवण्यासाठी आपण सज्ज राहावे असे आवाहनही आ.धस यांनी यावेळी केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close