क्राईमताज्या घडामोडी

*सामूहिक बलात्कार करणाऱ्या चार जणांच्या टोळीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा-जिल्हा प्रमुख सत्र न्यायालयाचा निकाल*

शेअर करा

 

बीड दि 22 प्रतिनिधी

शेतात गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या चार जणांच्या टोळीला बीड जिल्हा प्रमुख सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.या शिक्षेने सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना जरब बसली आहे.
यासंदर्भात माहिती अशी की, पीडित महिला 2015 मध्ये आपल्या शेतातुन घरी बीडकडे येत असताना जीपमध्ये बसवून पाचेगाव फाट्यावर एरंडगाव गायरानात नेऊन आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला.त्यानंतर मध्यरात्री पीडितेच्या गावाकडील घरी येऊन दरवाजा तोडून घरांमध्येही देखील बलात्कार केला होता.आरोपी जिजा लालसिंग राठोड वय 30, अमोल मदन काष्टे वय 30 कुंडलिक बन्सी राठोड 27, नवनाथ बाबुराव जाधव वय 28 अशी आरोपींची नावे आहेत.या आरोपींना बलात्कारासह इतर गुन्ह्याच्या अनुषंगाने ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
बीड जिल्हा प्रमुख सत्र न्यायालयाचे न्यायाधीश हेमंत महाजन यांनी चार आरोपीना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे या प्रकरणामुळे पीडितेला न्याय मिळाला असून यात सरकारी वकील म्हणून मिलिंद वाघिरकर यांनी काम पाहिले.सामूहिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशी शिक्षा दिल्याने गुन्हेगारांमध्ये जरब बसेल असा विश्वास देखील न्यायालयाने व्यक्त केला.
या प्रकरणी न्यायालयाने पती डॉक्टर , नायब तहसीलदार ,पोलिस उपअधीक्षक गौरव सिंग यांचे जबाब तपासले.

 

हेही वाचा:शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवड श्रेणी लागू करावी-मराठवाडा शिक्षक संघ

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close