ताज्या घडामोडीमराठवाडा

*लिंबोडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला;कड्यासह पाच गावांचा पाणीप्रश्न मिटला*

शेअर करा

 

कडा दि 18 सप्टेंबर प्रतिनिधी

पाच गावांना संजीवनी ठरत असलेला लिंबोडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. या तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे हा तलाव भरल्यामुळे कड्यासह पाच गावातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

लिंबोडी तलाव भरल्याने कडी नदी वाहती झाली आहे .या नदीला विविध भागातून प्रवाह सामील होत असल्याने नदी प्रवाहित झाली आहे.
आष्टी तालुक्यातील कडा गावासह पाच गावांना लिंबोडी तलावातून पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो.या लिंबोडी तलावाच्या लाभ क्षेत्रामध्ये असलेल्या शेतकऱ्यांनाही या तलावाचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. देविनिमगाव कडा या परिसरातील अनेक शेतकरी या प्रकल्पमुळे सुजलाम-सुफलाम झाले आहेत.


गेल्या दोन दिवसापासून धामणगाव आजूबाजूच्या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने लिंबोडी तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठयाची आवक झाली.त्यामुळे हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून लिंबोडी तलावावर अवलंबून असलेल्या पाच गावांना पिण्याचे पाण्याची टंचाई जाणवणार नाही. देवी निमगाव-लिंबोडी या प्रकल्पावर खिळद, गितेवाडी,लिंबोडी,कडा देवी-निमगाव यासह इतर गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून असतो. दरवर्षी कडा गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते त्याचा परिणाम प्रशासनावर होत असल्यामुळे प्रशासनाला या गावांसाठी टँकर द्यावे लागतात. मात्र आता लिंबोडी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या गावांना टँकरवर अवलंबून राहावे लागणार नाही. आष्टी तालुक्यातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असले तरी नद्या आता वाहू लागल्या आहेत.

हेही वाचा:*बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढला; दुपारपर्यंत 303 बाधित*

गेल्या अनेक वर्षापासून कडा येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असेल तसेच पावसाळ्यातही येथील नागरिकांना पिण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते आता मात्र हा तलाव पूर्ण क्षमतेने पडल्यामुळे या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि वापराच्या पाण्यासाठी तरी पाणी विकत घ्यावे लागणार नसल्याचे दिसत आहे. मात्र ग्रामपंचायतीने त्यासाठी पूर्ण क्षमतेने नागरिकांना पाणी पुरवणे आवश्यक आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close