ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज
Trending

*घरपोच दारू विक्रीसाठी राज्य शासनाची परवानगी*

शेअर करा

 

मुंबई दि 12 मे टीम सीएम न्यूज

अनेक दिवसापासून घरपोच दारू विक्री करण्यासाठी राज्य शासनाने समोर दबाव वाढत होता. यासंदर्भात राज्य शासनाने निर्णय घेऊन परवानाधारक व्यक्तीला घरपोच दारू देण्याचे आदेश आज जारी केले आहेत.
हे आदेश देत असताना राज्य शासनाने संबंधित परवानाधारक दारु विक्रेत्याकडे घरपोच सेवा देणाऱ्या व्यक्तीच्या संदर्भात काही अटी आणि शर्ती देण्यात आले असून याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे या आदेशात म्हटले आहे .
एखाद्या परवानाधारक व्यक्तीने मागणी नोंदवल्यास अशा व्यक्तीला त्याच्या निवासी पत्यावर घरपोच मद्य देण्याचे या आदेशात म्हटलेले आहे.
या आदेशानुसार ज्या व्यक्तीकडे मध्य पिण्याचा परवाना आहे अशाच व्यक्तीला घरपोच मद्यविक्री होणार आहे. म्हणजेच आता ऑनलाईन मद्य विक्री सुद्धा या दुकानदारांना करता येणार आहे .

Tags

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close