ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*टाळेबंदीचा फटका;पायी चालणाऱ्या मजबूर मजुराचा रस्त्यात मृत्यू*

शेअर करा

 

कडा दि,18 टीम सीएम न्यूज

पुणे येथून परभणीकडे पायी जाणाऱ्या एका व्यक्तीचा मृतदेह आज धानोरा ( ता आष्टी ) येथे आढळला .टाळेबंदीचा फटका सर्वाधिक मजुरांना बसला. आहे त्या स्थितीत मजूर गावाकडे निघाले .पायी चालणाऱ्या मजुरांच्या यातना काय असतात हे धानोरा येथील मजूराच्या मृत्यूने दिसून आले आहे .
धोपठे पोंडूळ, ता. मानवत, जिल्हा परभणी येथील मजूर पिंटू मनोहर पवार हा मजूर पुणे येथून परभणीकडे पायी जात होता.
पायी जाताना खायला मिळेल का याची शाश्वती नाही,तर कोणी मदत करायला पुढे येत नाही अशा अवस्थेत मजूर आपल्या गावाकडे पायी जात आहेत.
आज धानोरा शिवारात पत्र्याचे शेड मध्ये एक 40 वर्ष वयाचे पुरुष जातीचे प्रेत असल्याची माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी पाहणी केली असता कुजलेल्या स्थितीत असलेला मृतदेह आढळून आला,या मयताचे कपड्यांमध्ये असलेल्या चिठ्ठीतील मोबाईल नंबर वर संपर्क केला असता हा व्यक्ती पिंटू मनोहर पवार , रा. धोपठे पोंडूळ, ता. मानवत, जिल्हा परभणी येथील असल्याचे समजले, सदरचा व्यक्ती हा ऊसतोड मजूर असून तो ऊस तोडी संपल्यानंतर पुणे येथे त्याचे भावाकडे राहत होता परंतु लॉक डाऊनमध्ये अडकल्यामुळे त्याला गावी जाता येत नव्हते त्यामुळे तो पुणे येथून एक आठवड्यापूर्वी पायी गावी निघाला होता अशी माहिती मिळाली आहे.
सदर मयताचे नातेवाईक यांनी त्याचे प्रेत घेऊन जाणे शक्य नसल्याचे सांगितल्याने सदर माहिती त्यावर जागेवर पोस्टमार्टम करून त्याच ठिकाणी नातेवाईकांच्या परवानगीने अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
टाळेबंदी मध्ये मजुरांच्या मजबूर कथा वृत्त वाहिन्यांवर पहावयास मिळत आहेत .आता ह्या मजबूर कथा जवळ पास पहावयास मिळत आहेत .अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन दाभाडे करीत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close