ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

Madhi-yatra – *मढी येथील’भटक्यांची पंढरी’ चा यात्रोत्सव सुरु*

शेअर करा

 

मढी दि.9 मार्च । टीम सीएमन्यूज

भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्द असलेल्या श्री क्षेत्र मढी येथे चैतन्य कानिफनाथांंचा यात्रा उत्सव होळीपासून सुरू झाला हा उत्सव गुढीपाडव्यापर्यंत चालतो .

 

होळीच्या दिवशी कैकाडी समाजाच्या मानाच्या काठी वाजत गाजत नाथांच्या जयजयकार करत मंदिराच्या कळसाला भेटवुन मढी यात्रेस प्रारंभ झाला. भाविकांनी काठीवर रेवड्या उधळल्या . शंखाचा निनाद ढोलताशे डफाचा गजर, फटाक्यांची आतषबाजी करत मंदिराच्या शिखराला मानाची काठी भेटली. त्यानंतर दुपारी चारशे सत्तर वर्षांची ऐतिहासिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा असलेली राज्यातील गोपाळ समाजाची मढी येथील मानाची होळी शांततेत पेटली .

I

चैतन्य कानिफनाथांच्या गडाच्या बांधकामाला कष्टाची कामे अत्यंत सेवाभावी पद्धतीने गोपाळ समाजाने केल्याने नाथांनी स्वतः होळी पेटवण्याचा मान गोपाळ समाजाला दिला. या दिवशी मढीचे ग्रामस्थ होळीचा सण साजरा करत नाहीत. होळीचा सण सार्वजनिक रीत्या साजरा न करणारे मढी गाव राज्यात एकमेव ठरले आहे.

या निमित्तानं शांतता कायम ठेवण्यासाठी पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे यांच्यासह नगर शेवगाव पाथर्डी येथील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. प्रांतअधिकारी देवदत्त केकान, तहसीलदार नामदेव पाटील ,देवस्थान समितीचे अध्यक्ष शिवशंकर राजळे,उपाध्यक्ष सुनील सानप,विश्वस्त आप्पासाहेब मरकड, विश्वस्त मिलिंद चवंडके, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार, सरपंच रखमाबाई मरकड, बबन मरकड ,माजी सरपंच देविदास, मरकड ,रवींद्र आरोळे , माजी सरपंच भगवान मरकड , अप्पासाहेब मरकड , जनार्धन मरकड यासह अन्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close