क्राईमताज्या घडामोडी

*ऑनलाईन पेटीएम अपहार करणा-या पेटीएम कर्मचा-याचा महाराष्ट्र सायबर विभागातर्फे भांडाफोड*

शेअर करा

मुंबई दि.१९,प्रतिनिधी
सोशल इंजिनिअरिंगचा वापर करून ऑनलाईन पेटीएम अपहार करणा-या पेटीएम कर्मचा-याचा महाराष्ट्र सायबर विभागातर्फे भांडाफोड करण्यात आला त्यामुळे छोटे व्यापारी आणि शेतकऱ्याची कष्टाचे पैसे वाचवण्यात यश आले असल्याची माहिती सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी दिली आहे.

   यासंदर्भातील अधिक माहिती अशी, दि. ०५ ऑक्टोंबर रोजी मुंबईच्या अंधेरी  भागातील दुग्ध व्यावसायिक  राजेश मनसुख पटेल यांनी महाराष्ट्र सायबर कडे तक्रार केली की दि.२०/०८/२०२० आणि दि. २०/०९/२०२० रोजी त्याच्या पेटीएम अकांऊंट मधुन त्यांचे अपरोक्ष  ५० हजार ४४८ रुपये अज्ञात व्यक्तीने काढून घेतले आहेत.
सदरच्या तकारीवरुन नोडल सायबर पोलीस ठाणे, महाराष्ट्र सायबर, मुंबई येथे भारतीय दंड विधान कलम ४२०, ३४ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० चे कलम ४३ (अ),६६, ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होतात घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ नोडल सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी गुन्ह्याशी संबधीत बाबींची तपासणी, अभ्यास करून तांत्रीक पदधतीने  तपास करत संशयीत आरोपी
MD, MUNNA उर्फ मोहम्मद मुन्ना, पाशिउद्दीन अन्सारी, वय २५ वर्षे, व्यवसाय – फिल्ड सेल्स एक्झिकेटीव्ह, यास
तात्काळ अटक करण्यात आलेली असुन सदर आरोपीने इतरही व्यावसायीकाचे पेटीएम अकाउंटचे पासवर्ड चोरून ते गैरकामासाठी वापरल्याचे पुढे येत आहे.

*नागरीकांना आवाहन*

नागरीकांना महाराष्ट्र सायबर तर्फे  आवाहन करण्यात येते की. छोट्या व्यावसायिकाचे मर्चंट  वॉलेट अकाउंट उघडून देण्याच्या ,तसेच त्यांचा पासवर्ड सेट करून देण्याचे बहाण्याने त्यांचा पासवर्ड स्वतःकडे घेवुन अश्या मर्चंट वॉलेटचा वापर नंतर आर्थिक अपहारा करिता करीत असल्याचे समोर आले आहे. तरी सर्व लहान मोठ्या मर्चंट वॉलेटच्या ग्राहकांना सुचित करण्यात येते की,
त्याच्या मोबाईल क्रमांकांचे मर्चट वाँलेट खाते इतर कोणी वापरत नाही ना? याची खात्री करून आपला पासवर्ड स्वतः बदलून तो स्वत: पुरता मर्यादीत ठेवावा व सतत बदलत राहावा.

हेही वाचा:आज ३५१ रुग्णांना डिस्चार्ज तर २५४ बाधितांची रुग्णसंख्येत भर*

सदरची कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव,  पोलीस उपमहानिरीक्षक  हरिश बैजल,  पोलीस अधिक्षक  डॉ. बालसिंग राजपुत, पोलीस अधिक्षक  सचिन पांडकर, पोलीस उप अधिक्षक  विजय खैरे, यांचे मार्गदर्शनाखाली नोडल सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश सरदेसाई, सहा- पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव, पोलीस उपनिरीक्षक  संदिप पाटील, पो.हवा. विश्वास मोहिते,पो शि. हर्षल रोकडे, शैलेश साळुंखे, पो. शि.निलेश
जंगम, पो. शि. शाम हगवणे यांनी  केली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close